आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेल्वे प्रवासात सामान चोरी वा हरवल्यास, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवू शकता. सामान न मिळाल्यास भरपाई मिळू शकते. भास्करचे पवनकुमार यांना वकील मनीष भदौरिया यांनी गुन्हा दाखल करणे आिण भरपाईची प्रक्रिया सांगितली...
{रेल्वेत सामान चोरी वा हरवल्यास काय करावे? रेल्वेत सामान हरवल्यास त्वरीत याची माहिती टीटी व गार्डला दिली पाहिजे. त्यांच्या माध्यमातून घटनेची माहिती संबंधित रेल्वे ठाण्यापर्यंत पोहोचते. ज्या स्टेशनवर सामान चोरी वा हरवले आहे. तेथील ठाण्यात तक्रार दाखल केली जाऊ शकते. रस्त्यात शक्य नसल्यास ज्या रेल्वे स्थानकावर उतरणार आहात, तेथे जीआरपी ठाण्यात तक्रार दाखल करू शकता. {हरवलेल्या सामानाचे काय विवरण द्यावे? केवळ हरवलेले वा चोरीच्या सामानाची माहिती रेल्वे पोलिसांना द्यावी लागेल. त्यासाठी पुराव्याची गरज नाही. {सामान जप्त न झाल्यास भरपाई कशी मिळेल? प्रत्येक रेल्वे विभागात व्यवस्था निश्चित आहे. सामान चोरी किंवा हरवल्याच्या प्रकरणावर ६ महिन्यांपर्यंत कारवाई न झाल्यास रेल्वेला सामानाची भरपाई देणे बंधनकारक आहे. त्यासाठी रेल्वे सुरक्षा दल सहायक पोस्टातून फॉर्म घेऊन भरावा लागेल. हा फॉर्म गुन्ह्यावेळी भरला जाऊ शकतो. यानंतर फॉर्म भरल्यास तो जेथे गुन्हा नोंद आहे,तेथे जमा करावा लागेल. रेल्वे सामानाच्या किमतीचा अंदाज बांधून भरपाई देईल. फॉर्म भरल्यानंतर न मिळाल्यास ग्राहक मंचात जाऊ शकता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.