आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपिटीची शक्यता:उद्यापासून पुन्हा पाऊस, गव्हासह आंबेही महागणार; आजारही बळावण्याचा धोका

छत्रपती संभाजीनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार, १३ मार्चपासून जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे रब्बीवर संकट निर्माण झाले आहे. आंबा मोहरावर दुष्परिणाम होत असून मानवी आरोग्याच्या तक्रारींतही वाढ झाली आहे. शनिवारी कमाल तापमान ३४.५ अंश इतके होते. किमान तापमानात २ अंशांनी घट होऊन ते १५.२ अंशांवर नोंदले गेले. पहाटेच्या गारठ्यात किंचित वाढ झाली आहे. दुपारच्या सत्रात उन्हाचा सौम्य चटका जाणवत आहे.

होळीनंतर मार्चमध्ये तापमान वाढण्यास सुरुवात होते. मात्र, हवामान बदलामुळे ढगांची गर्दी होऊन काही वेळेत जेथे पोषक वातावरण तेथे पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी कोसळल्याने मंगळवारी कमाल तापमानात १० अंशांनी घसरण होऊन ते २५.३ अंशांवर आणि किमान तापमानात ४ अंशांनी कमी होऊन १३.२ अंशावर स्थिरावले होते. बुधवारी कमाल तापमानात वाढ झाली असली (३२.४) तरी ते सरासरीच्या तुलनेत ३ अंशांनी कमीच होते. किमान तापमान गुरुवारी १६ अंश, शुक्रवारी १३.३ अंश तर शनिवारी १५.२ अंशांवर नोंदले गेले. यावरून तापमानात कमालीचा चढउतार होत असल्याचे स्पष्ट होते.

यामुळे होणार पाऊस उत्तर भारतात, हिमालय पर्वतरांगांमध्ये बर्फवृष्टी होत आहे. पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. तिकडील अतिशीत वारे, बाष्प आपल्याकडे वाहून येत आहेत. आपल्याकडे उन्हाळा सुरू असून उष्णता असते. त्यामुळे कमी हवेचा दाब तयार होतो. आकाशात ढग जमा होतात. आर्द्रता वाढली आहे. म्हणजेच उष्ण, शीत, बाष्पयुक्त वाऱ्याचा आकाशात संगम होऊन उद्यापासून जेथे पोषक वातावरण तिथेच अवकाळी पाऊस, गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

बातम्या आणखी आहेत...