आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस:राज्यात सर्वदूर बरसला पाऊस; 2 दिवस राहणार पावसाचा जोर, उत्तर महाराष्ट्रासाठी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी राज्यात सर्वदूर पाऊस पडला. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले. पावसाची तूट पडलेल्या धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यांत गुरुवारी चांगला पाऊस झाला, तर औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबादसह विदर्भातील जिल्ह्यांत पावसाने चांगली हजेरी लावली. पावसाचा जोर शनिवारपर्यंत राहील. त्यानंतर प्रमाण कमी होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

पुणे वेधशाळेनुसार, द. महाराष्ट्र किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीलगत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच विदर्भ व लगतच्या भागात चक्रीय चक्रवाताची स्थिती आहे. बंगालच्या उपसागरावरून मान्सून वारे सुरू आहेत. या अनुकूल स्थितीमुळे राज्यात शनिवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहील. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होईल.

दोन दिवस दमदार पावसाचे
२० व २१ ऑगस्ट रोजी उ. महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात या काळात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...