आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नैसर्गिक आपत्ती:राज्यावर पाऊस, गारपिटीचे सावट; सोलापूर, बीड, उस्मानाबादसह 10 जिल्ह्यांत वादळी वाऱ्याची शक्यता 

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता; दहा जिल्ह्यांत वादळी वारे

अजय कुलकर्णी

राज्यावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागराकडून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे राज्यात १९ ते २१ एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता आहे. रविवारी राज्यात वादळी वारे वाहण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दहा जिल्ह्यांना या वाऱ्याचा फटका बसू शकतो. दरम्यान, राज्यातील काही भागात उन्हाचा तडाखा वाढला आहे. शनिवारी अकोला येथे राज्यातील सर्वाधिक ४३.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. 

दहा जिल्ह्यांत वादळी वारे 

कुलाबा वेधशाळेनुसार, राज्यातील मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना  फटका बसण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांत वादळी वारे वाहण्याची शक्यता ५१ ते ७५% आहे. या जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमीपर्यंत राहील, असे वेधशाळेने म्हटले आहे. 

  • १९ एप्रिल : पुणे वेधशाळेनुसार विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता.
  • २० एप्रिल : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता.
  • २१ एप्रिल : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.

गारपिटीचीही शक्यता 

पश्चिम अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्याचा प्रवाह कच्छ भागातून दक्षिणेकडे सुरू आहे. त्याच वेळी उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि राज्यावरील कमी दाबाचे क्षेत्र यामुळे राज्यातील बहुतांश भागात २२ एप्रिलपर्यंत जोरदार वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. -डॉ. रामचंद्र साबळे, हवामानतज्ञ

बातम्या आणखी आहेत...