आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाऊस:मराठवाड्यात गारपीट, वीज पडल्याने एकाचा मृत्यू, उस्मानाबादमध्ये वादळी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान

औरंगाबाद एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • अनेक भागांत शेतात पाणी साचले

जालना, बीड, नांदेड, औरंगाबाद, परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. यात काही ठिकाणी गारा पडल्या. भोकरदन तालुक्यातील हसनाबाद परिसरातील खडकी येथे झाडावर वीज पडल्याने हार्ट फेल होऊन ३२ वर्षीय नितीन काकासाहेब मैद या मेंढपाळाचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातही हलका पाऊस झाला.

भोकरदन, बदनापूर तालुक्यात गारपीट झाली. बदनापुरात केळी, टरबूज, तर भोकरदन तालुक्यात मिरची पिकाचे तसेच कैऱ्यांचा सडा पडला होता. तर, जालना तालुक्यात हलका पाऊस झाला.

पाटोदा शहरात गारांसह जोरदार : पाटोदा शहरात गारांसह जोरदार पाऊस झाला. बीड शहरातही १० मिनिटे पाऊस झाला. पैठण, सिल्लोड  व औरंगाबाद तालुक्यांतील अनेक गावांत  जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगीत गारपीट झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब, वाशी, भूम, उस्मानाबाद शहरासह परिसरात पाऊस झाला.

- नांदेड शहरात शनिवारी रात्री २ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. लोहा तालुक्यातील बेटसावंगी येथे शेतातील आख्याड्यावर वीज पडून १४ वर्षांचा एक मुलगा जखमी झाला. देविदास देवराव हंबर्डे असे जखमी मुलाचे नाव आहे.

- परभणी तालुक्यातील झरी व टाकळी सर्कलमधील गावांत शनिवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

- उस्मानाबाद जिल्ह्यातही वादळी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक भागांत शेतात पाणी साचले होते. झाडेही उन्मळून पडली. 

बातम्या आणखी आहेत...