आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसात अडकलात तर...:उंच झाड, विजेचे खांब, लाेखंडी पाइपपासून राहा दूर; कोसळणार नाही वीज अन् वाचेल जीव

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यात गेल्या दीड वर्षात वीज काेसळल्याने 106 जणांनी गमावले प्राण

यंदा जून महिन्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाले. त्यानंतर काही दिवस पावसाने दडी मारली. परंतु जुलै महिन्यात पुन्हा दमदार आगमन झाले. याच दरम्यान ढगांच्या गडगडाटासह वीज कोसळण्याच्या घटनांमध्येही वाढ होत असते. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये वीज पडून जीवितहानी होण्याचे प्रकारही अधिक आहेत. शेतातील उंच झाडापासून दूर राहणे, प्रवास करत असलेल्या चारचाकी वाहनातून खाली न उतरणे, विजेचे खांब, लाेखंडी पाइप अशा वस्तूंच्या जवळ न जाणे अशा बाबींचे पालन केले तर अशा दुर्दैवी घटनांपासून आपण वाचू शकताे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मराठवाड्यात औरंगाबाद जिल्हा वगळता इतर सात जिल्ह्यात २७ ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा उभी करण्यात आली. परंतु असे असले तरी वीज कोसळण्याच्या घटना सातत्याने घडतच आहेत. गेल्या वर्षभरात सात जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्यामुळे ७२ जणांना जीव गमवावा लागला होता. यंदाही ही संख्या कमी झालेली दिसत नाही. वीज पडण्याची घटना घडून जीवितहानी होऊ नये या उद्देशाने विविध जिल्ह्यात वीज अटकाव यंत्रणा उभारण्यात आली आहे. यात नांदेड जिल्ह्यात मुखेड, मरखेड (ता.देगलूर), येवली (ता. हदगाव), बाचोटी (ता.कंधार), परभणीत सोन्ना, बोरवंड, जिंतूर तालुक्यातील मानकेश्वर, गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी, हिंगोली जिल्ह्यात पिंपळदरी व साटंबा येथे ही यंत्रणा कार्यरत आहे.

वीज कडाडते तेव्हा काय काळजी घ्यायला हवी?
- शेतातील उंच झाडांवर पाण्याचा अंश असताे. त्यामुळे ती वीजवाहक बनतात व याच झाडांवर वीज काेसळण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यापासून दूर राहायला हवे.
- प्रवास करताना विजेचा कडकडाट सुरू असेल तर वाहनातून खाली उतरू नये. टायरमुळे वाहनाचा जमिनीला स्पर्श होत नाही व वाहनावर वीज कोसळत नाही.
- शेतात काम करत असताना विजेचा कडकडाट होत असेल तर शक्यतो उंच झाडाच्या खाली थांबू नये. तसेच ओल्या जागेवर उभे राहू नये. पायाखाली लाकूड, प्लास्टिक गोणपाट किंवा कोरडा पाला पाचोळा ठेवावा.
- विजेचे खांब, टेलिफोन खांब, लोखंडी पाइप यापासून दूर राहावे.
- विजा चमकत असताना फ्रिज, टेलिफाेनला स्पर्श करू नये. माेबाइल तातडीने बंद करावा, धातूची कांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नये.
- प्रा. पी. आर. नाळेश्वरकर, जिल्हा संघटक, मराठी विज्ञान परिषद, हिंगोली.

ढगांच्या घर्षणामुळे कडाडत असते वीज
ढगांत पाण्याचा अंश असतो. त्यात असलेल्या अणूमध्ये धन आणि ऋण प्रभार (पाॅझिटिव्ह, निगेटिव्ह चार्ज) असताे. जेव्हा इलेक्ट्राॅन प्रभार कमी हाेतात तेव्हा धन प्रभार माेठ्या प्रमाणावर वाढताे. आकाशात ढग एकमेकांजवळ आले की धन प्रभारामुळे ते दूर ढकलले जाऊन घर्षण निर्माण हाेते. त्यातूनच वीज निर्मिती हाेते. या घर्षणाच्या वेळी तब्बल ५० ते ६० हजार विभव (पाेटेन्शियल) तयार हाेतात. जमिनीचा विभव शून्य असल्यामुळे उच्च पातळीवरील ऊर्जा खालच्या पातळीवर वाहते व वीज काेसळते.

बातम्या आणखी आहेत...