आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोलाचा भात अन्... ‎:मराठवाड्यासाठी घोषणांचा‎ पाऊस; निधी गुलदस्त्यात‎

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र‎ फडणवीस यांनी सादर केलेल्या‎ अर्थसंकल्पात समाजातील सर्व‎ घटकांसाठी तरतूद केली आहे.‎ मराठवाड्याच्या दृष्टीनेही या‎ अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा‎ करण्यात आल्या. पण काही अपवाद‎ वगळता निधीच्या प्रत्यक्ष तरतुदीबद्दल‎ स्पष्ट उल्लेख यात केलेला दिसत नाही.‎ त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.‎ अर्थसंकल्पात छत्रपती संभाजीनगर‎ विमानतळाच्या भूसंपादनासाठी ७३४‎ कोटी निधी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट‎ केले आहे. ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र व परिसर‎ विकासासाठी ३०० कोटींचा निधी देण्याची‎ घोषणा केली आहे. यामुळे औंढा‎ नागनाथ, परळी वैजनाथ, घृष्णेश्वर या‎ मराठवाड्यातील तीन ज्योतिर्लिंगांच्या‎ ठिकाणी विकासकामे मार्गी लागण्यासाठी‎ फायदा होऊ शकतो. याशिवाय बीड‎ जिल्ह्यातील गहिनीनाथ गडाच्या संवर्धन व‎ विकासासाठी २५ कोटी,‎ सोलापूर-तुळजापूर-धार ाशिव या ८४‎ किमीच्या नवीन ब्रॉडगेजसाठी राज्याचा‎ ४५२ कोटींच्या निधीची तरतूद केली आहे.‎ जालना-खामगाव रेल्वेमार्गासाठीही‎ राज्याचा हिस्सा दिला जाणार आहे.‎ छत्रपती संभाजीनगर येथील वाळूजला ५०‎ कोटींतून नवे क्रीडा विद्यापीठ करण्याची‎ घोषणा केली आहे.‎

या क्षेत्रासाठी घोषणा, पण निधीचा उल्लेख नाही‎ मराठवाडा वॉटरग्रीड निर्माण‎ करण्याची घोषणा. "हर घर जल''‎ योजनेंतर्गत वाॅटरग्रीडचा प्रस्ताव‎ केंद्राकडे मान्यतेसाठी पाठवला.‎नागपूर-गोवा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग‎ होणार. यात माहूर, तुळजापूर, कोल्हापूर,‎ अंबाजोगाई ही शक्तिपीठे आणि औंढा‎ नागनाथ, परळी वैजनाथ, नांदेडचा गुरुद्वारा‎ या मार्गाद्वारे जोडणार असल्याचा उल्लेख.‎ प्रत्यक्ष तरतुदीचा उल्लेख नाही.‎सीमावर्ती भागातील रस्ते, वीज,‎ पाणी, शिक्षणासाठी सर्वंकष कार्यक्रम‎ तयार करण्यात येणार.‎धाराशिव, परभणीतील वैद्यकीय‎ महाविद्यालयांचे बांधकाम करणार.‎ निधीबद्दल काहीही उल्लेख नाही.‎

पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या‎ नागपूर येथील फुटाळा तलावाच्या‎ धर्तीवर विकासासाठी आवश्यक निधी‎ देणार.‎नांदेड येथे वीर बाल दिन महोत्सव‎ करणार. पण निधीचा आराखडा नाही.‎जालना-बुलडाणा जिल्ह्यांच्या‎ सीमेवर जाळीचा देव तीर्थक्षेत्र‎ विकासासाठी भरीव तरतूद.‎छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील‎ म्हैसमाळ, वेरूळ, खुलताबाद, शूलिभंजन‎ विकास आराखड्याला निधी.‎ख्यातकीर्त विचारवंत, साक्षेपी‎ समीक्षक कै.नरहर कुरुंदकर यांच्या‎ स्मारकास आवश्यक निधी देणार.‎मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या‎ अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध‎ कार्यक्रम आयोजित करण्यास निधी देणार.‎ गत अर्थसंकल्पात अजित पवार यांनी‎ यासाठी ७५ कोटींचा निधी दिला होता.‎

मराठवाड्याबाबत नेहमीच दुजाभाव
राज्याच्या अर्थसंकल्पात यापूर्वीही अनेक आश्वासने देण्यात आली होती. वैधानिक‎विकास मंडळाच्या बाबतीतही दोन वर्षांपूर्वी आश्वासित केले होते.‎परंतु त्याची पूर्तता काही केली नाही. यंदाही घोषणा मोठ्या करण्यात‎आल्या. परंतु त्यावर विश्वास किती ठेवावा हाही प्रश्नच आहे.‎राज्याच्या अर्थसंकल्पातही मराठवाड्याच्या वाट्याला फारसे काही‎आले असे वाटत नाही. नेहमीच दुजाभाव केल्याचे दिसून येते.‎- माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, अध्यक्ष, मराठवाडा जनता‎विकास परिषद.‎

बातम्या आणखी आहेत...