आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहरी मान्सून:दुष्काळी पट्ट्यावर आभाळमाया, 17 जिल्ह्यांमध्ये पावसाची तूटच; मध्य महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात कमी पाऊस

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील विदर्भ वगळता इतर विभागांत जून-जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद

यंदा नैऋत्य मोसमी पाऊस दुष्काळी भागावर मेहेरबान झाल्याचे चित्र आहे. जुलैपर्यंत मराठवाडा आणि सोलापूर, नगर जिल्ह्यातील अवर्षणप्रवण भागात सरासरीहून जास्त पाऊस झाला आहे. त्याच वेळी विदर्भातील नऊ जिल्ह्यांत पावसाने अद्याप सरासरी गाठलेली नाही. राज्यातील १७ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यात धरणांत समाधानकारक पाणीसाठा असला तरी मध्य महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात कमी पाऊस झाला आहे.

यंदा राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्रात जूनपासूनच जोरदार पाऊस झाला. जुलैअखेर दुष्काळी पट्ट्यात सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत जून-जुलैमध्ये जास्त पाऊस झाला आहे. त्याचबरोबर अहमदनगर, सोलापूर, सांगली या अवर्षणप्रवण भागातही पावसाने सरासरी ओलांडली आहे.

पुणे विभागातील धरणे रिकामी, नाशिक विभागात गतवर्षीइतका पाणीसाठा

> यंदा जून-जुलैमध्ये नाशिक विभागातील जळगाव, धुळे जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने या दोन्ही जिल्ह्यांतील जलसाठ्यात समाधानकारक पाणीसाठा आहे. मात्र नाशिक जिल्ह्यात जुलैमध्ये पावसाचा जोर कमी होता. नाशिक विभागात सर्व प्रकल्पांत गतवर्षी जुलैअखेर ३३ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता, यंदा ३५ टक्के आहे.

> पुणे विभागातील बहुतांश धरणे यंदा जुलैअखेरही पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. गतवर्षी जुलैअखेर ४९ टक्के उपयुक्त जलसाठा होता. यंदा तो ३५ टक्के आहे.

राज्यात जोरदार पावसाची शक्यता : तीन ते पाच ऑगस्ट या काळात जोरदार पाऊस होईल.

> ऑरेंज अलर्ट (११५.६ ते २०४.४ मिमी पाऊस) : औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, नगर, नाशिक, लातूर, सातारा, पुणे, कोल्हापूर, कोकण.

> यलो अलर्ट (६४.५ ते ११५.५ मिमी पाऊस) : सोलापूर, सांगलीसह विदर्भातील सर्व जिल्हे.

पावसाची तूट असलेले जिल्हे

नंदुरबार (-३४ % ), नाशिक (-०२%), सातारा (-२९ %),कोल्हापूर (-१४ %), पुणे (-०२ %), अकोला (-२० %), अमरावती (-१० %), भंडारा (-२२ %), चंद्रपूर (-०२ %), गडचिरोली (-२६ %), गोंदिया (-४६ %), नागपूर (-५ %), वर्धा (-०४ %), यवतमाळ (-१९ %),पालघर (-३० %), रायगड (-१७ %), ठाणे (-१८ %)

बातम्या आणखी आहेत...