आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद, जालना, परभणी व नांदेड जिल्ह्यांतील काही भागांत गुरुवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली, घरांवरील पत्रे उडाले.
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील काही भागांत महावितरणच्या तारांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. कन्नड तालुक्यातील पिशोरसह शफियाबाद, मोहंद्री परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तसेच अजिंठ्यात बसस्थानकासमोर रस्ते महामार्ग प्राधिकरणाने काम अपूर्ण सोडल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप आले होते. जालना शहर व परिसरात गुरुवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्यांची धावपळ उडाली, तर अनेकांनी पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला. नांदेड शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत पहाटे चार वाजेपर्यंत हा पाऊस सुरू होता. शहरातील नव्या पुलावरील रस्त्यासह विविध भागांतील सखल रस्त्यावर पाणी साचले होते. वावळी येथील हनुमान वाडीच्या मारुतीपासून धर्माबादपर्यंत विजेचे वीस खांब आडवे झाले. अनेक जुने वृक्ष वादळाने उन्मळून पडले. अनेकांच्या घरांवरील टीनपत्रे गावाबाहेर पाचशे मीटरपर्यंत उडून पडले. परभणी शहरातदेखील पावसाने हजेरी लावली. शहरातील वसमत रोड भागात वादळी वाऱ्यात लिंबाचे झाड रस्त्याने जाणाऱ्या रिक्षावर पडले. जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. परभणी शहरातील वसमत रोड भागात गुरुवारी वादळी वाऱ्यात लिंबाचे झाड रस्त्याने जाणाऱ्या रिक्षावर पडले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.