आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतुकीचा खोळंबा:संग्रामनगर उड्डाणपुलाची उंची वाढवा : सातारा-देवळाई कृती समितीचे निवेदन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संग्रामनगरसमोरील बीड बायपासवर होत असलेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम तांत्रिकदृष्ट्या चुकलेले आहे. एक चूक झाकण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपुलाखाली खोदकाम करून रस्ता तयार करण्यात येत आहे. निसर्गतः उंचावर असणारा हा भाग भुयारासारखा दिसणार आहे. या ठिकाणी होणारी वाहतूक अधिक गुंतागुंतीची ठरणार आहे. पावसाळ्यात येथे पाणी साचून ते ओसरेपर्यंत वाहतुकीचा खोळंबा होणार आहे. त्यामुळे पुलाची उंची वाढवण्यात यावी, या मागणीचे निवेदन सातारा-देवळाई जनसेवा कृती समितीच्या वतीने विभागीय आयुक्तांना देण्यात आले. या निवेदनावर बद्रीनाथ थोरात, आबासाहेब देशमुख, रामदास मनगटे, असद पटेल आदींच्या साक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...