आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिथावणीखोर भाषणावरून राज ठाकरेंविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना जामीन मिळू शकतो. मात्र, त्यांच्यावर लावण्यात आलेली कलमे पाहता तपासानंतर न्यायालयात हे आरोप सिद्ध झाल्यास पुढीलप्रमाणे शिक्षा होते.
भादंवि ११६ : कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधांची चिथावणी देणे पण प्रत्यक्षात अपराध घडत नाही. या गुन्ह्यात आदेशित कमाल मुदतीच्या एक चतुर्थांशाइतका कारावास किंवा दंडाची शिक्षा होऊ शकते. .
भादंवि ११७ : जनतेकडून किंवा दहापेक्षा अधिक व्यक्तींकडून गुन्हा घडून येऊ शकतो, अशा प्रकारची चिथावणी देणे. या कलमान्वये तीन वर्षांचा कारावास किंवा दंड होऊ शकतो. यात गुन्हे दखलपात्र आहेत किंवा अदखलपात्र यावर शिक्षा िनश्चित होते.
भादंवि १५३ : दंगली घडवून आणण्याकरिता बेछूटपणे चिथावणी देणे. या जामीनपात्र कलमात गुन्हा सिद्ध झाल्यास १ वर्षाचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ -१३५ नुसार अधिकाऱ्यांना, सेवकांना चाकरी सोडून पळून जाण्यास चिथावणी देण्याचा आरोप ठेवला जातो. हा आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यास दोन वर्षांचा कारावास किंवा दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. या कलमान्वये दाखल गुन्हे जामीनपात्र असले तरी ते सिद्ध झाल्यास मात्र िशक्षेची तरतूद पाहता ते अिधक गंभीर ठरतात. राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाची पडताळणी करून पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले असून आता पुढील कारवाई काय केली जाते, याकडे सामान्यांचे लक्ष आहे.
नोटीस बजावून बोलावले जाईल...
ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर सिटी चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांच्याकडे याप्रकरणी तपास सोपवण्यात आला. अहवालाच्या व्यतिरिक्त एफआयआरमध्ये म्हटल्यानुसार ठाकरे यांच्या वादग्रस्त भाषणांचे पुरावे गोळा केले जातील. साक्षीदार शोधले जातील. त्यानंतर आरोपींना जबाबासाठी नोटीस बजावून बोलावण्यात येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.