आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधार्मिक स्थळ अधिकृत की अनाधिकृत या वादात मी पडणार नाही. धार्मिक स्थळाचा वाद नेहमी मोठा होता. देशात मुस्लिम समाज 17 टक्के असून 80 टक्के हिंदु समाज आणि इतर धर्मिय आहेत. धार्मिक स्थळाच्या मुद्द्यावरून वाद मोठे होत असतात त्यामुळे या विषयावर मी बोलणार नाही असे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.
मनसे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी आझाद मैदान, ठाण्यातील उत्तर सभा आणि औरंगाबादेतील सभेत शरद पवारांवर चांगलेच तोंडसुख घेत प्रखर शब्दात टीका केली. शरद पवार जातीयवादी आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राज्यात जातीय तेढ निर्माण झाल्याचा आरोप राज यांनी केला होता. त्या धर्तीवर राज ठाकरेंवर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून कडाडून टीका होत आहे.
आजच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज यांना टोला लगावताना ''चोराच्या उलट्या बोंबा'' अशा शब्दात खिल्लीही उडवली होती त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनीही राज यांना रंगरंगोटी करून हिंदुत्वाची शाल पांघरल्याची टिका केली.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
रंगरंगोटी करून राज ठाकरे हिंदुत्वाची शाल पांघरत आहेत. ते बाळासाहेब होऊ शकतात असे त्यांना वाटते. पण बुद्ध दुसरा होणे नाही, चार्वाक दुसरा होणे नाही हे राज ठाकरेंनी समजून घ्यावे असा टोलाही राज ठाकरेंना आव्हाडांनी लगावला.
आव्हाडांनी केले महत्वपूर्ण विधान
चित्रपट सृष्टीतील पडद्यामागील कलाकार, वृत्तपत्र प्रकाशनाच्या मागिल कामगार हे घटक कायम दुर्लक्षित राहिले आहेत. ह्या घटकांना घर देण्याची माझी ईच्छा आहे. ह्या आठवड्यात विभागाशी बोलून ह्यांना घर देण्याचे मार्ग खुले करेन. घर देण्यासारखं दुसर पुण्य नाही अशा आशयाचे ट्विटही जितेंद्र आव्हाड यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.