आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Raj Thackeray's Voice Doubled; In The Police Confusion, The Limit For The Meeting Was 50 Decibels, The Noise Increased To 120; The Police Will Report To The Home Minister

दिव्य मराठी विशेष:राज ठाकरेंचा आवाज अडीचपटीने वाढला; सभेसाठी मर्यादा 50 डेसिबलची, 120 पर्यंत वाढला आवाज

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी महाराष्ट्रदिनी म्हणजे १ मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेतली. मशिदींवरील भोंग्यांचा आवाज हाच त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दा होता. मात्र, त्यांनी स्वत:ही नियमांचे पालन केले नाही. पोलिसांनी ५० डेसिबलची मर्यादा घालून दिली होती. त्याच्या सुमारे अडीचपट म्हणजे १२० डेसिबलपर्यंत त्यांचा आवाज पोहोचला होता. याप्रकरणी मुंबईला अहवाल जाईल, अशी माहिती सोमवारी (२ मे) वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार सभेचा भोंगा ५० डेसिबलची मर्यादा पाळणार की नाही, असा प्रश्न होता. सभेच्या ठिकाणी दोन पोलिस कर्मचारी ध्वनिमापक यंत्रांसह तैनात करण्यात आले होते. यासंदर्भात दिव्य मराठी प्रतिनिधीने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर १२० डेसिबलपर्यंत आवाज गेला होता, अशी नोंद मापकांवर झाल्याचे सांगितले. याशिवाय सभेत जात, धर्म, पंथ, वंशाविषयी प्रक्षोभक वक्तव्य करू नये, अशीही अट टाकली होती. त्याचा भंग झाला किंवा नाही, हे तपासून मुंबईला अहवाल पाठवला जाईल, अशीही माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...