आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग 24 तास केले जलतरण:राजेश भोसले-पाटील यांचा आगळावेगळा उपक्रम यशस्वी, पर्यावरण रक्षण-संवर्धनासाठी अहोरात्र झटणाऱ्यांना अभिवादन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणाऱ्या व्यक्तींचा आपण गौरव कसा करू, एखादा पुष्पगुच्छ गुच्छ देवून किंवा मान्यवरांच्या हस्ते शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह देवून करू शकतो. मात्र पर्यावरणासाठी स्वत: वेड्यासारखे दिवस-रात्र काम करणाऱ्या औरंगाबादच्या एका व्यक्तीने चक्क एक दिवस म्हणजे चक्क 24 तास जलतरण केले. औरंगाबादच्या राष्ट्रीय जलतरणपटू राजेश भोसले-पाटील यांनी पर्यावरण रक्षण-संवर्धनासाठी अहोरात्र झटणाऱ्यांना अभिवादन करण्यासाठी जलतरण केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 3 व 4 जून रोजी पर्यावरणप्रेमी व राष्ट्रीय जलतरणपटू राजेश भोसले एमजीएम जलतरणिकेत सलग 24 तास जलतरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आणि तो यशस्वीरित्या पूर्ण देखील केला. जिल्ह्यातील पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी झटणाऱ्या असंख्य नागरिक, संस्था, संघटना, मंडळांना मानवंदना देण्यासाठी व त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भोसले यांनी ‘माझा प्राणवायू-माझी जबाबदारी’अंतर्गत हा जलतरणाचा उपक्रम हाती घेतला होता. 3 जून रोजी ते दुपारी ४ वाजता तलावात उतरले आणि 4 जून रोजी 4 वाजता आपला उपक्रम पूर्ण केला. यावेळी एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, विरेंद्र भांडारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉक्टरांची देखरेख, अनेकांची साथ

या उपक्रमादरम्यान शहरातील युवांपासून ते जेष्ठ जलतरणपटूंनी काही फेऱ्या जलतरण करुन पाटील यांना साथ दिली. त्यांचा उत्साह वाढवला. यावेळी त्यांच्यावर लक्ष्य ठेवण्यासाठी डॉक्टरांचे एक पथक सज्ज होते. 24 तासात एकदाही त्यांच्या शरीरावर कुठलाही परिणाम झाला नाही. जलतरणादरम्यान त्यांनी फळांचा ज्युस, सुकामेवा, चॉकलेट असा आहार घेतला.

सलग जलतरणाची तिसरी वेळ

राजेश भोसले यांनी यापूर्वी 13 तास आणि 20 असे दोन वेळा सलग जलतरण केले. संरक्षण व संवर्धनासाठी आदेश छत्रपतींचा, कर्तृव्य मावळ्यांचे, पर्यावरण रक्षणाचा 2019 मध्ये सलग 13 तास जलतरण करुन संदेश दिला. त्यानंतर भारताचे माजी राष्ट्रपती स्व. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे स्वप्न होते की, भारताने पर्यावरणीय दृष्ट्या सशक्त-सक्षम असावे, म्हणून पर्यावरणाच्या जनजागृती करण्यासाठी मोठया प्रमाणात देशी झाडे लावली जावी म्हणून मिशन 2020 अंतर्गत सलग 20 तास पोहून पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश दिला होता. आता तिसऱ्या वेळी पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्यांना अभिवादन करण्यासाठी 24 तास जलतरण केले.

1 लाख बोधिवृक्ष वाटपाचे लक्ष्य

भोसले यांनी जिल्ह्यात 1 लाख बोधिवृक्ष वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे. आतापर्यंत जवळपास 15 हजार बोधिवृक्ष त्यांनी वाटप केले. बोधिवृक्ष हे सर्वाधिक ऑक्सिजन देणारे झाड आहे. बौद्ध धर्मात त्याला विशेष महत्व आहे. त्यांनी स्वत: आतापर्यंत 2 हजार पेक्षा अधिक झाडे लावली.

बातम्या आणखी आहेत...