आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा:वनडे क्रिकेट स्पर्धेत राजेश शिंदेचे शतक; सीके स्पोर्टसचा मोठा विजय

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्रीच्या पाल येथील एचएसजे स्टेडियमवर सुरू असलेल्या वनडे क्रिकेट स्पर्धेत राजेश शिंदेच्या शतकाच्या जारोवर सीके स्पोर्टस संघाने शानदार विजय मिळवला. बुधवारी झालेल्या लढतीत सीकेने समर्थ क्रिकेट अकादमी, बुलढाणा संघावर 61 धावांनी मात केली. या सामन्यात राजेश शिंदे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सीके स्पोर्टसने 49.4 षटकांत सर्वबाद 262 धावा उभारल्या. यात संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जीत राजपूत व करणराज सिंग जग्गी भोपळाही फोडू शकले नाहीत. सी.के. कोठारीने 64 चेंडूंत 7 चौकारांसह 41 धावा केल्या. मित रोहराने 26 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार लगावत 22 धावा काढल्या. त्यानंतर आलेल्या राजेश शिंदेने शानदार शतक ठोकले. त्याने 88 चेंडूंचा समाना करताना 9 चौकार व 5 उत्तुंग षटकार खेचत 106 धावा ठोकल्या. कर्णधार प्रफुल्ल कललानीने 27 चेंडूंत 5 चौकारांसह 29 धावा केल्या. तळातील फलंदाज अर्थव तोतलाने 47 चेंडूंत 2 चौकार मारत 22 धावांचे योगदान दिले. ध्रुव ढेकणेने 11 धावा जोडल्या. समर्थकडून प्रतिक मोरे, राेहित लांडे, संजय पुरीने प्रत्येकी दोन दोन गडी बाद केले. रोहित चांदल, ओम इंगळे, अजित नरोटे यांनी प्रत्येकी एकाला टिपले.

समर्थची फलंदाजी ढेपाळली

प्रत्तत्युरात समर्थ अकादमीचा डाव 31.2 षटकांत 201 धावांवर ढेपाळला. यात अजीत नरोटेने 16, रोहित लांडेने 24, अनिकेत चिंचोलेने 18, सार्थक नेटकेने 35, ओम इंगळेने 30 धावा काढल्या. पियुष नरवडेने 49 चेंडूंत 7 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 41 धावा काढल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली. सीकेकडून ध्रुव ढेकणे, प्रफुल्ल कमलानी, कबिर लांडगे यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.