आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात सानुग्रह योजना:राजीव गांधी अपघात सानुग्रह योजनेचा 31 विद्यार्थ्यांना लाभ, 8 प्रस्ताव अपात्र, तर अपघातात 37 जणांचा मृत्यू

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात औरंगाबाद जिल्ह्यातील विविध शाळांतील ३१ विद्यार्थ्यांना राजीव गांधी अपघात सानुग्रह योजनेचा लाभ मिळाला असून ८ प्रस्ताव अपात्र ठरले. रस्ते अपघातात ३७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली.

शालेय विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने राजीव गांधी अपघात सानुग्रह योजनेंतर्गत मदत दिली जाते. यात विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू, अपघातामुळे अपंगत्व येणे, पाणी भरताना विहिरीत पडणे, नदी, नाले, तलावात पोहताना बुडणे, रस्ता ओलांडताना, स्कूल बसमधून खाली पडणे व सर्पदंश आदी अपघातासाठी या योजनेचा लाभ दिला जाताे.

बातम्या आणखी आहेत...