आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्टिकोन:एआयशी संबंधित काल्पनिक कथांचा आधार काय आहे?

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अचेतन बुद्धीचा वापर करून शरीर लढतेही. तेही मशीन लर्निंगसारख्याच अनुभवांमधून, त्यावर आधारित मूल्यांकनांमधून शिकते. बुद्धिमत्तापूर्ण शिक्षण घेण्यासाठी चेतनेची गरज शरीरासाठी किंवा यंत्रासाठी आवश्यक नाही, हे स्पष्ट आहे.

एआयच्या आव्हानांबद्दल बोलताना यंत्रांच्या चेतनेवर प्रश्न उपस्थित करणे विसंगत आहे. एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटिलजन्सचे सजीव प्राणी म्हणून चित्रण करणाऱ्या काल्पनिक विज्ञान कथांनी एआयबद्दल लोकप्रिय गैरसमजांना उत्तेजन दिले आहे. येणाऱ्या एआय क्रांतीला नगण्य ठरवून त्यांनी एक विघातक गोष्ट केली आहे. लोक सहसा बुद्धिमत्ता आणि चेतना यांच्यात गोंधळून जातात. मानवी बुद्धी ही केवळ एक प्रकारची बुद्धी आहे, तर बुद्धिमत्ता अनेक स्वरूपात अस्तित्वात आहे आणि ती चेतन किंवा अचेतन दोन्हीही रूपात असू शकते.

एआय आणि आर्टिफिशियल कॉन्शसनेस (बनावट चैतन्य) खूप भिन्न आहेत. मशीन इंटेलिजन्स म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या मानवासारखी कार्ये करण्यासाठी मशीनच्या क्षमतेचा संदर्भ देते. कोणतीही प्रणाली बुद्धिमान होण्यासाठी चेतना आवश्यक किंवा पुरेशी नाही. एक बुद्धिमान यंत्रणादेखील अचेतन असू शकते. याउलट चेतन प्रणाली बुद्धिमत्तेशिवाय अस्तित्वात असू शकते. ट्रक ड्रायव्हरचे काम ड्रायव्हरशिवाय वाहनाकडे जाते तेव्हा त्या वाहनात चेतना आहे की नाही, हे महत्त्वाचे नाही. महत्त्व फक्त एवढेच आहे की, यंत्रे माणसांच्या नोकऱ्या हिरावून घेऊ शकतात, कारण यंत्रे ते काम माणसांपेक्षा चांगल्या आणि कमी खर्चात पूर्ण करू शकतात. घोड्यांना चेतना असते तर वाहनांमध्ये नसते, हे आपल्याला माहीत आहे, परंतु या फरकाने वाहनांना पूर्वीच्या घोड्यांपेक्षा चांगले काम करण्यापासून रोखले नाही. त्याचप्रमाणे चालकविरहित कार आणि ट्रक्सच्या आगमनाने सध्याची मोटार वाहने आणि त्यांचे उद्योग कालबाह्य होतील. त्याच प्रकारे मानवी तज्ज्ञांप्रमाणे संगणक क्ष-किरणांचे विश्लेषण करतात. यासोबतच इतर वैद्यकीय निदानेही अत्यंत कौशल्याने आणि अचूकतेने केली जातात. त्यामुळे या मशीन सचेतन आहेत की नाही, याचा आरोग्यसेवा क्षेत्राशी काहीही संबंध नाही.

संवादात सहभागी होणाऱ्या व्यक्तींना व्याकरणात ‘पुरुष’ म्हणतात. पुरुषांचे तीन प्रकार आहेत - उत्तम, मध्यम आणि इतर. खाली सादर केलेली भाषिक चौकट एआय आणि कृत्रिम चेतना यामधील फरक समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे.

उत्तम पुरुषाच्या वाक्यांमध्ये व्यक्ती स्वतःबद्दल काही तरी चर्चा करते, उदा. माझ्या भावना किंवा माझे घर इ. उत्तम पुरुष वाक्ये वक्त्याचा अहंकार किंवा ‘मी’ प्रकट करतात. हा ‘मी’ जाणण्याच्या क्षमतेला चैतन्य म्हणतात. मध्यम पुरुष वाक्ये म्हणजे जे श्रोत्यांना संबोधित करतात किंवा जे आपले ऐकतात. उदा. ‘तुम्ही काय करत आहात?’ मध्यम पुरुष वाक्ये परस्पर असतात आणि समोरच्या व्यक्तीला किंवा व्यक्तींना संबोधित करतात. इतर पुरुष वाक्ये दोन लोकांमधील परस्पर चर्चेचा विषय असलेल्या वस्तू किंवा व्यक्तीचा संदर्भ देतात. ते ‘तो’ किंवा ‘ते’ सारखी सर्वनामे वापरतात. ज्या विषयावर चर्चा केली जात आहे ती व्यक्ती एक अचेतन वस्तू किंवा अगदी निराकार विचारदेखील असू शकते. उदा. ‘तो खूप हुशार आहे.’

मानवाला तीन बाजू आहेत : उत्तम पुरुष आपल्या अहंकाराचे प्रतिनिधित्व करतो; मध्यममध्ये आपले परस्पर संबंध आहेत आणि इतर पुरुष म्हणजे बोध-धारणेचे एक मानसिक वस्तूसारखे क्षेत्र आहे. एखाद्या व्यक्तीत बाहेरून एक सचेतन आत्मा असल्याचे कितीही दिसत असले तरीते एक यंत्र आहे आणि आतून सचेतन आत्मा असल्याचे भासवत आहे, ही शक्यता नाकारू शकेल अशी कोणतीही चाचणी नाही.

यंत्रांच्या आत्म-चेतनेचा विचार करणे हे आर्टिफिशियल काॅन्शियसनेसचे कार्य आहे. एआयचे बहुस्तरीय आणि व्यावहारिक परिणाम समजत नाहीत असे अनेक विचारवंत तात्त्विक प्रश्नांमध्ये व्यग्र आहेत, ते आर्टिफिशियल काॅन्शियसनेसच्या क्षेत्रासाठी योग्य आहेत आणि एआयच्या संदर्भात अप्रासंगिक आहेत. परंतु, अशा युक्तिवादांचा एआयच्या प्रभावाच्या विषयाशी काहीही संबंध नाही. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

राजीव मल्होत्रा लेखक आणि विचारवंत rajivmalhotra2007@gmail.com

बातम्या आणखी आहेत...