आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींचे मोफत लग्न लावणार:भूमिपुत्र सामाजिक संस्थेतर्फे राजमाता जिजाऊ, बालशिवाजी पुतळ्याचे अनावरण

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बजाजनगरातील भूमिपुत्र सामाजिक संस्थेतर्फे राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे बालस्वरूप असणारे स्मारक उभारण्यात आले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच विनोद पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. संस्थेतर्फे आर्थिक परिस्थिती हलाखीची असणाऱ्या कुटुंबातील मुलींचे मोफत लग्न लावून देणार आहे. वऱ्हाडी मंडळींच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे पोपटराव अधिक यांनी दिली. सदरील खर्च उद्योजक विजय जाधव करणार आहेत.

संस्थेच्या माध्यमातून हे उपक्रम चालतात : मृत पावलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ‘स्वर्गरथ’ उपक्रमांतर्गत दोन वाहने, हर्सूल कारागृहातील कैद्यांना प्रतिवर्षी ब्लँकेट, उन्हाळ्यात फॅन दिले जातात, अंध प्रशिक्षण केंद्रातील मुलींना किराणा व इतर गरजेच्या वस्तू दिल्या जातात, प्रतिवर्षी चार वेळा रक्तदान शिबिर घेण्यात येते. नुकतेच १२ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये ५७ दात्यांनी रक्तदान केले.

बातम्या आणखी आहेत...