आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिव्यांगा मुलांना सकस आहार देणे आवश्यक आहे. यासाठी पालकांना साध्या-सोप्या पध्दतीने राजश्री अग्रवाल यांनी रेसिपी सांगितल्या. तसेच मुलांच्या बौध्दिक विकासासाठी सिद्धार्थ उद्यानात वनभोजन, खेळण्याचा आनंद घेतला.नवजीवन मतिमंद मुलांच्या शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात आले. सिद्धार्थ उद्यानात मुलांनी वनभोजनासह खेळांचा आनंद घेतला. चित्रकला स्पर्धा, खेळाच्या स्पर्धा झाल्या. कविता सप्रे यांनी हस्तकला विषयावर कार्यशाळा घेऊन टाय अँड डायच्या सोप्या पध्दतीने एक्रीलीक रंग काम शिकवले. विद्यार्थ्यांनी अतिशय सहजतेने हे कौशल्य आत्मसात केले. ६ तारखेला मुलांना एकत्र डबा पार्टीचा आनंद घेतला. ७ तारखेला नवजीवन मतिमंद मुलांच्या शाळेत महिला व पालकांसाठी पाककृतीचा कार्यक्रम झाला. यामध्ये राजश्री अग्रवाल यांनी हेल्दी सूप, इन्स्टंट इडली, आणि इतर पाककृती शिकवल्या. कार्यशाळेस प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, पालकउपस्थित होते.
इन्स्टंट इडली पॅनमध्ये तेल टाका, गरम झाल्यानंतर राई टाका, हरभरा डाळ, उडीद डाळ टाका. हिरवी मिरची टाका. गाजर, हिंग टाकून हलवा. रवा टाकून गरम करा. यानंतर एका वाटीत काढून त्यात कोथिंबीर, मीठ, दही, इनो टाकून मिक्स करा. पाणी टाका. प्लेटला तेल लावा तयार केलेले मिश्रण बारा मिनिटांपर्यंत गॅसवर ठेवा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.