आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुन्या भांडणावरून रामराव गायकवाड यांचा खून केल्याच्या आरोपाखाली अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. के. कुलकर्णी यांनी आरोपी राजू काशीनाथ उमाप याला जन्मठेपेची शिक्षा व २० हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. दंडाची संपूर्ण रक्कम फिर्यादी तथा मृताच्या पत्नीस नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशात म्हटले आहे. अभियोग पक्षातर्फे सरकारी वकील मधुकर आहेर यांनी काम पाहिले.
सिंधुबाई रामराव गायकवाड (५२, रा. दहिगाव, ता. सिल्लोड, ह.मु. वडगाव कोल्हाटी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १४ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ७ वाजता सिंधुबाई व त्यांचे पती रामराव गायकवाड घरी होते. गल्लीत राहणारे आरोपी राजू काशीराम उमाप (२१) व काशीराम उमाप (दोघे रा. डोमेगाव, ता. गंगापूर, ह.मु. वडगाव कोल्हाटी) दोघे गायकवाड यांच्या घरासमोर आले. त्यांनी जुन्या वादावरून शिवीगाळ केली. रामराव गायकवाड यांना आरोपी राजूने मारहाण करून त्यांच्या डोक्यात लाकडी दांडा घातला. त्यामुळे ते बेशुद्ध पडले. उपचार सुरू असताना १८ सप्टेंबर २०१८ रोजी रामराव यांचे निधन झाले. प्रकरणात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पैरवी अधिकारी म्हणून फौजदार बी. बी. कोलते, सहायक फौजदार एम.एस. हरणे व पो. कॉ. बी.ए. बोर्डे यांनी काम पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.