आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूर्तीची प्राणप्रतिष्ठा:सव्वा कोटी खर्चातून गुलमंडीत 2 वर्षांत उभारणार राम मंदिर ; चांदीची गणेशमूर्तीही बसवणार

औरंगाबाद / गिरीश काळेकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचे हृदयस्थान असलेल्या गुलमंडी येथील पार्किंगजवळील सीमंत बागला यांच्या घराच्या मध्यभागी राजस्थानी शैलीचे श्रीराम मंदिर उभारण्यात येत आहे. सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करून दोन वर्षांत हे मंदिर पूर्ण करण्याचा विश्वस्तांचा प्रयत्न आहे. यात १०० वर्षे पुरातन अशा संगमरवरातील राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

अयोध्येत उभारणी होत असलेल्या श्रीराम मंदिराकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. तेथीलप्रमाणेच गुलमंडीतील मंदिरासाठीही राजस्थानमधून खास गुलाबी रंगाचे दगड मागवण्यात आले आहेत. त्यावर कोरीव नक्षीकामसुद्धा करण्यात आले आहे. पूर्वीही या भागात मंदिर होते. मात्र, ते मोडकळीस आल्याने मूर्ती तेथून हलवण्यात आल्या व या ठिकाणी मंदिराची नवीन वास्तू उभारण्याचा निर्णय भक्तांनी घेतला होता. सर्वप्रथम २०१७ मध्ये विश्वस्त मंडळ स्थापन करून ट्रस्टची नोंदणी करण्यात आली. २०१९ मध्ये मंदिराचे डिझाइन तयार करण्यात आले. मात्र, कोरोनामुळे पुढील प्रक्रियाच थांबली होती.

दिवाळीनंतर सुरू होईल काम : दिवाळीनंतर लोकसहभागातून मंदिराचे काम सुरु होणार आहे. माजी आमदार किशनचंद तनवाणी ट्रस्टचे अध्यक्ष तर आमदार प्रदीप जैस्वाल उपाध्यक्ष आहेत. वल्लभ बागला, सुरेश झंवर, दयाराम बसैये, श्रीनिवास खटोड यांचाही ट्रस्टच्या कार्यकारिणीत समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...