आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध वाळू उपसा:पैठणमधून सर्रास अवैध वाळू उपसा,‎ नदीपात्राची चाळणी प्रशासनाचे दुर्लक्ष,‎

पैठण19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ना टेंडर, ना लिलाव तरीही रोज पैठण येथील‎ गोदावरी नदीपात्रातून शेकडो ब्रॉस वाळू उपसा होत‎ आहे. तहसीलचे वाळूविरोधी पथक कागदावरच‎ असून, रात्रभर अवैध वाळू उपसा केला जात आहे.‎ रात्रभर हायवा, पिकअप वाहनांसह वाळू विक्री होत‎ आहे. वाळूविरोधी पथकाने केलेल्या दुर्लक्षामुळे‎ आपेगाव, दादेगाव, मायगाव, हिरडपुरी या ठिकाणाहून‎ वाळू उपसा सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीपात्राची‎ चाळणी होऊन ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...