आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

और वो आंखोंसे गजल कह गये:अंकुशराव कदमांचा शायराना अंदाज; औरंगाबादच्या 'एमजीएम' विद्यापीठात रंगला मुशायरा

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हम अल्फाजो को ढूंढते रह गये, और वे आंखोंसे गजल कह गये...असा शायराना अंदाज एमजीएम विद्यापीठाचे विश्वस्त अंकुशराव कदमांचा पाहायला मिळाला.

एमजीएमच्या आर्यभट्ट सभागृहात रंगलेल्या मुशायऱ्यात शहरातील नामवंत उर्दू शायरांनी हजेरी लावली. ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.

मुशाऱ्यामध्ये प्रेम व कोरोना काळातील ऑक्सिजनच्या महत्त्वावर शेर पेश करत अंकुशराव कदमांनी रसिकांची दाद मिळवली. शायरांनी एकाहून एक सरस राजकीय, सामाजिक विषयांवर शेर सादर केले. यावेळी एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम यांनाही शेर म्हणायचा मोह आवरता आला नाही.

हम अल्फाजो को ढूंडते रह गये

और वो आंखोंसे गजल कह गये.

कोरोन काळातील ऑक्सिजनच्या महत्त्वावरही अंकुशराव कदमांनी शेर पेश केला.

हर चिज की किमत

वख्त पर पता चलता है

मुफ्त मे मिलने वाली हवा

ऑक्सिजन अब अस्पताल मे

बहुत महंगा मिलता है

अस्लम मिर्झा यांनी आपल्या शैलीत म्हणाले...

मुकद्दर के है ये सारे खेल

समझे नही जाते

हवाये जब नही चलती

पतंग ऊंचे नही जाते

सडक कैसी है,

कितने मोड है

और कैसा मौसम है

सफर हो शर्त तो

ये मसले देखे रहे जाते

एमजीएम विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज (आयआयएफएल) संस्थेच्या वतीने शायरांच्या उपस्थितीत मुशायराचे. उद्घाटन एमजीएमचे विश्वस्त प्राचार्य प्रतापराव बोराडे, कुलपती अंकुशराव कदमांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमजीएम विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, आयआयएफएलच्या संचालक डॉ. शैली अस्थाना, मुशायराचे अध्यक्ष डॉ. ए. जी. खान, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ उर्दू साहित्यिक नुरुल हसनेन, अस्लम मिर्झा, डॉ. यूसूफ साबीर, अभियंता जावेद निदा, अहेमद औरंगाबादी, डॉ. गझाला परवीन, डॉ. मुस्तफा खैरी या ख्यातनाम शायरांची उपस्थिती होती.

या प्रसंगी शायरांनी राष्ट्रभक्ती, प्रेम, कोरोना, राजकीय,सामाजिक तरुणाई आदी विषयांवर शायरी पेश करून सभागृह दोन तास खिळवून ठेवले. यावेळी वेळी हिंदी विभागप्रमुख कवयित्री डॉ. शहनाज बासमेह यांनी अंकुशराव कदम यांच्या कार्यावर केलेल्या कवितेने दाद मिळवली. सूत्रसंचालन उर्दू विभागाच्या प्रा. डॉ. अस्वद गोहर यांनी तर आभार इंग्रजी विभागाच्या प्रा. डॉ. रिहाना सय्यद यांनी मानले. यशस्वीतेसाठी मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. राम गायकवाड, डॉ. शहनाज बासमेह, धोंडीराम बामणीकर यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...