आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराघव फाउंडेशन व शारदा संगीत विद्यालयाच्या वतीने आयोजित गीतरामायण कार्यक्रम नुकताच मसापच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगला. कार्यक्रमाचे उद्घाटन पंडित विजय देशमुख आणि मीनल देशमुख यांच्या हस्ते झाले. कृष्णकांत मुळे गुरुजी यांनी आशीर्वादपर स्तोत्र पठण केले.
या कार्यक्रमात प्रा. विजयकुमार रामदासी संचलित “सावी संगीत अकॅडमी व कराओके स्टुडिओ’ या स्कूल ऑफ इंडियन क्लासिकल व लाइट म्युझिक प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.
प्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके व गीतकार ग. दि. माडगूळकर यांनी अजरामर केलेली ‘गीतरामायणा’तील २४ गीते सादर करण्यात आली. त्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निषाद देशमुख याच्या “स्वये श्री राम प्रभू ऐकती” या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रा. विजयकुमार रामदासी, प्रा. केदार देशमुख , स्नेहा राठोड-पवार या प्रमुख गायकांनी उत्तमप्रकारे गीत गायन केले. सीमा रामदासी यांनी माहितीपूर्ण निवेदन केले. त्यांना पौर्णिमा देशमुख यांनी सुरेख साथ दिली. मिलिंद डोलारे (सिंथेसायझर), विजेंद्र मिमरोट (सिंथेसायझर), पं. शरद दांडगे (तबला), राहुल जोशी (ऑक्टोपॅड) यांनी सुरेख साथसंगत करून कार्यक्रमात रंगत आणली. प्रकाश सुरवसे यांनी ध्वनी संयोजन केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.