आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासृजन देशपांडे, सचिन नेवपूरकर आणि पं. हेमंत पेंडसे यांच्या चतुरस्त्र गायकीने पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सवाचे पहिले पुष्प शनिवारी गुंफले गेले. स्वरांच्या मांदियाळीत सजलेल्या गायकीने रसिक तृप्त झाले. ध्यास परफॉर्मिंगच्या पंडित जसराज स्वरमंदिरात हा सोहळा झाला.
मैफलीची सुरुवात पुण्याचे युवा कलाकार सृजन देशपांडे यांनी केली. राग शुद्ध सारंगमध्ये बडा ख्याल त्यांनी अदाकारीने फुलवला. यानंतर स्वर मंचाचा ताबा औरंगाबादचे गायक सचिन नेवपूरकर यांनी घेतला. राग शुद्ध बराडी सादर करत मैफिलीत रंग भरला. राग यमनमधील दोन स्वरचित बंदिशी सादर केली. उत्तरार्धात मैफलीवर पं. हेमंत पेंडसे यांनी साज चढवला. मिलिंद गोसावी आणि प्राची खोत यांनी संवादिनीवर साथ केली, तर तबल्याची साथ प्रशांत गाजरे आणि सुधांशू परळीकर यांनी केली. तानपुरा साथसंगत कन्हैया बाहेती, सुयश कुलकर्णी व आसावरी सामग यांनी तर ऋषिकेश कमलाकर यांनी टाळाची साथ केली. निवेदनाची बाजू अंकिता मुळे हिने सांभाळली. कार्यक्रमात पं. शौनक अभिषेकी, पं. सत्यशील देशपांडे, डॉ. वैशाली देशमुख आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.