आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

स्टिअरिंगवरून टोलेबाजी:गाडी एक, दोन जण स्टिअरिंगवर अन् मागे एक जण बसून गाडी चालवण्याच्या प्रयत्नात अपघात होऊ नये - दानवेंचा सरकारला टोला

संतोष देशमुख| औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चंद्रकांत पाटील तसे बोललेच नाही, दानवेंकडून भाजप प्रदेशाध्यक्षांची पाठराखण

राज्यात सध्या दोन जण स्टिअरिंगवर एक पाठीमागे बसून सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कधीही अपघात होऊ शकतो. यांच्याकडे ना विमा, ना परवानगी त्यामुळे राज्यातील सरकार केव्हाही कोसळू शकते, असा टोला केंद्रीय मंत्र रावसाहेब दानवे यांनी लगावला. औरंगाबादेत एका कार्यक्रमाप्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते. दरम्यान आम्ही स्वातंत्र निवडणूक लढवणार असल्याचा सूतोवाच त्यांनी यावेळी केला. चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याचा अर्थ वेगळा घेतला, ते तसे बोललेच नाही, असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांची पाठराखण केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाल्यानंतर भाजप सत्तेवर आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सभापती राधाकिसन पठाडे यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास फटाक्यांची आतषबाजी, जय शिवराय जय शंभुराजे च्या गजरात आश्वरूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी शेकडो शिवप्रेमी, संचालक मंडळ, भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

पावसात भिजून भाषण केल्याने यश मिळत
पावसात भिजून भाषण केल्याने यश मिळते. कदाचित हे पुढचे संकेत असू शकतात. त्यामुळे पाऊस होताच मी उभा राहिलो असल्याचा टोला भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना नाव न घेता लगावला. यानंतर एकच हशा पिकला.

औरंगाबादेत भाजपच्या वतीने दुध दरवाढीसाठी आंदोलन

1 ऑगस्ट रोजी सकाळी शहरातील केंब्रिज चौकात भाजपाच्या वतीने दुध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. असे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शुक्रवारी जाहीर केले. शेतकऱ्यांना एक दिवस दुध बंद पाळण्याचे व आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.