आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानवे संतापले:मोबाइल रेकॉर्डिंग होत असल्याचे कळताच भडकले रावसाहेब दानवे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे भेटीतील संभाषणाची चित्रफीत मोबाईलमधे रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न भाजप - शिंदेसेनेच्या शिष्टमंडळातील भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने केला. हा प्रकार लक्षात येताच दानवे त्याच्यावर प्रचंड संतापले होते.त्यांनी सर्वांसमक्ष त्याची कानउघाडणी केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वैजापूरल जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी भाजप - शिंदेसेना पक्षातील दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांचे सात-आठ जणांचे शिष्टमंडळ दानवे यांच्या औरंगाबाद येथील निवासस्थानी दोन दिवसांपूर्वी भेटीला गेले होते. या शिष्टमंडळातील सदस्यांशी दानवे मनमोकळेपणाने गप्पा मारताना त्यांना आपले बोलणे मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी स्वत: या पदाधिकाऱ्यांचे मोबाईल तपासले. तेव्हा त्यातील एकजण रेकॉर्डिंग करत असल्याचे उघडकीस आले. आणि दानवे आधी त्या पदाधिकाऱ्यावर आणि नंतर शिष्टमंडळावर भडकले होते.

बातम्या आणखी आहेत...