आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:बलात्कारी आरोपी फरारच, शिंदेसेनेकडून पाठराखण ; बळजबरी गर्भपाताची फिर्याद

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन दिवसांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल असलेला शिवसेनेच्या शिंदे गटाचा कार्यकर्ता ज्योतीराम विठ्ठल धोंगडे-पाटील फरार झाला असून त्याला शोधण्यात अजूनही मुकुंदवाडी पोलिसांना यश आलेले नाही. दरम्यान, पक्षाने मात्र त्याची पाठराखणच केली आहे. आरोप निश्चित होत नाहीत तोपर्यंत पक्षातून काढण्याबाबत कारवाई केली जाणार नसल्याचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले. एका विवाहितेच्या फिर्यादीवरून ज्योतीरामवर गुन्हा दाखल झाला आहे. त्याने आपल्यावर बलात्कार केला. बळजबरीने गर्भपात करायला लावून आपल्याकडून दोन कोटी रुपये उकळले, असेही महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, जिल्हाप्रमुख जंजाळ म्हणाले, ज्योतीरामकडे पक्षात कुठलेेही पद नाही. मात्र तो कार्यकर्ता आहे. तो गुन्हेगार असल्याची खात्री पटताच त्याच्यावर पक्ष कारवाई करेल. मात्र आमच्याकडे जी माहिती आहे त्यानुसार, तक्रारदार महिला व ज्योतीराम हे लिव्ह इनमध्ये राहत होते. तसा बाँडही त्यांनी केला होता. त्यामुळे त्याच्याविरोधातील तक्रारीत आम्हाला तथ्य वाटत नाही. पोलिसांनी चौकशी केली असती तर कदाचित हा गुन्हा दाखल झाला नसता. राजकीय षड््यंत्रातून हा गुन्हा दाखल असल्याचे जंजाळ म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...