आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉक्सो’चा गुन्हा:शेजारच्या घरी खेळण्यासाठी गेलेल्या मुलीवर बलात्कार; चिकलठाणा पोलिसांनी केली आरोपीला अटक

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीच्या घरी लुडो खेळण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर मैत्रिणीच्या मामानेच बलात्कार केल्याची खळबळजनक घटना २२ जुलै रोजी गंगापूर जहांगीर येथे घडली. बलात्कारानंतर आरोपीने पीडितेला जिवे मारण्याची धमकी दिली. मात्र आई-वडिलांना हा प्रकार माहीत झाल्यानंतर ५ ऑगस्ट राेजी उमेश सोमिनाथ दांडगे ऊर्फ भाईजान (३२) याच्याविरोधात चिकलठाणा पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

दहावीत शिकणारी सोनल (नाव बदलेले आहे) ही आई-वडील, बहीण, भावासोबत गंगापूर जहांगीर येथे राहते. २२ जुलै रोजी दुपारी ४ वाजता शेजारी राहणारी मुलगी सोनलकडे आली आणि आपण माझ्या घरी लुडो खेळू असे सांगत तिला घरी नेले. तेव्हा उमेशने भाचीला बाजूच्या रूममध्ये जाण्यास सांगितले. नंतर साेनलचे तोंड दाबून बलात्कार केला. सहायक निरीक्षक विश्वास पाटील यांनी आरोपीला ताब्यात घेतले. तपास उपनिरीक्षक अश्विनी कुंभार करत आहेत.

याआधीही असा प्रकार
उमेशला गावात त्याचा मित्र परिवार भाईजान नावाने ओळखतो. ताे गावात गुंडगिरी करताे. याआधीही नात्यातील एका महिलेवर त्याने अतिप्रसंग केला होता. ते प्रकरणही चिकलठाणा पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले होते. मात्र त्या वेळी तक्रारदाराने तक्रार दिली नसल्याने गुन्हा दाखल झाला नव्हता. यामुळे उमेशची हिंमत वाढली व त्याने हा प्रकार केला.

समजावणाऱ्यांना धमकी
सोनलचे आई-वडील मजुरी करतात. सोनलने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर उमेशने त्यांच्या घरी जाऊन आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या तिच्या वडिलांनी शहरात राहणाऱ्या मित्रांना ही माहिती दिली. मित्रांनी गावी जाऊन उमेशला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मित्रांनादेखील तुम्ही या प्रकरणामध्ये पडू नका, तुम्ही औरंगाबादेत राहता, तिकडेच राहा, अशी धमकी दिली.

बातम्या आणखी आहेत...