आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैसर्गिक कृत्य:महिलेवर बलात्कार; व्यापाऱ्यास कोठडी

छत्रपती संभाजीनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार व अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या व्यापाऱ्याविरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात ४ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहंमद सिद्दिकी युसूफ मोतीवाला (४७, रा. मकसूद कॉलनी, रोशन गेट) असे आरोपी व्यापाऱ्याचे नाव आहे. त्याला रविवारी न्यायालयात हजर केले असता ८ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एच. खेडकर यांनी दिले.

पतीसोबत पटत नसल्याने १४ वर्षांपूर्वी विभक्त झालेली महिला तिच्या एका मुलासह एकटी राहत होती. दरम्यान, तिची ओळख मोहंमद याच्याशी झाली. पुढे गुंगीचे औषध देऊन आरोपीने महिलेवर त्याच्या गोडाऊनमध्ये बलात्कार करत त्याचे चित्रण मोबाइलमध्ये केले. ही घटना शुद्धीवर आलेल्या महिलेच्या लक्षात येताच तिने मोहंमदकडे जाब विचारला असता ‘यासंदर्भात कोणास काही सांगितले तर तुझा व्हिडिओ व्हायरल करेल’ असे धमकावत त्याने महिलेशी वारंवार बलात्कार केला. तसेच मी तुझ्याशी लग्न करतो असे म्हणत विश्वासात घेतले. लग्नाबाबत महिला वारंवार विचारणा करत असल्याने आरोपी तिला धमकावत होता. अखेर पीडित महिलेने जिन्सी पोलिस ठाण्यात धाव घेत व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...