आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:मित्रासोबत भांगसीमाता गडावर गेलेल्या तरुणीवर बलात्कार; आराेपींनी दाेघांनाही केली जबर मारहाण

औरंगाबाद3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भांगसीमाता गड परिसरात फिरायला गेलेल्या तरुणीला व तिच्या मित्राला दाेन तरुणांनी बेदम मारहाण केली. तसेच तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी दौलताबाद पोलिसांनी अज्ञात आराेपींविराेधात गुन्हा दाखल केला आहे.

आैरंगाबाद शहरापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर भांगसीमाता गड आहे. हा परिसर आधीच निर्जन असताे. त्यात सध्या लाॅकडाऊनचा काळ असल्यामुळे सहसा तिकडे कुणी जात नाही. ४ ऑगस्ट राेजी एक २० वर्षीय तरुणी आपल्या मित्रासह गडावर फिरण्यासाठी गेली हाेती. सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास हे दाेघे गडावर बसलेले हाेते. त्याच वेळी दाेन तरुण तिथे दाखल झाले. त्यांनी या दाेघांकडे विचारपूस करून त्यांना अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. गडावर आजूबाजूला इतर कुणीही नसल्याचे पाहून त्यापैकी एका आरोपीने तरुणीला जोरात पकडले व गडाच्या एका बाजूला खोल भागात नेले. दुसऱ्या आरोपीने मुलीच्या मित्राला लांब ओढत नेत त्यालाही बेदम मारहाण सुरू केली. तसेच जिवे मारण्याची धमकी देत पकडून ठेवले. दुसऱ्या नराधमाने तरुणीला गडावरील एका खड्ड्यात नेत तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या वेळी दुसरा आरोपी तिच्या मित्राला पकडून उभा होता. या घटनेची कुठेही वाच्यता केली तर जिवे मारू, अशी धमकी देऊन हे अत्याचार करणारे दाेघे आराेपी पळून गेले. याप्रकरणी मंगळवारी रात्रीच दाैलताबाद पाेलिसात तक्रार दाखल झाली. पोलिसांनी संशयिताचा तपास सुरू केला आहे.