आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटकपूर्व जामीन:विधवेवर बलात्कार, आरोपीचा जामीन रद्द ; जातीचे कारण देत लग्नास दिला नकार

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिलेवर वारंवार बलात्कार करून जातीचे कारण देत लग्नास नकार दिला. तसेच तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देणारा आरोपी सजन हिराचंद घुसिंगे (३०, रा. गोकुळवाडी, माळीवाडा) याने सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.के. कुलकर्णी यांनी नामंजूर केला.

प्रकरणात २७ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली हाेती. पीडितेचे लग्न २०१० साली लग्न झाले होते. तिला एक दहा वर्षांचा मुलगा आहे. ८ मे २०१९ रोजी पीडितेच्या पतीचे निधन झाले. सन २०१९ मध्‍ये पीडितेची फेसबुकवर आरोपीशी ओळख झाली होती. ते एकमेकांना मेसेजवर बोलत होते. आरोपीने फेसबुकवर पीडितेला प्रपोज केले. मात्र तिने नकार दिला. त्यामुळे आरोपी तिला आत्महत्या करण्याची धमकी देत पुलावरचा फोटो पाठवत होता. त्यादरम्यान पीडितेच्या पतीचे निधन झाले. याचा फायदा घेत आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवले. ती त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकल्यानंतर त्याने बीड बायपास येथील कमलनयन बजाज रुग्णालयाजळील एसी लॉजवर बोलावून अनेक वेळा बलात्‍कार केला. २०२०-२१ मध्ये पीडिता गर्भवती राहिली होती.

बातम्या आणखी आहेत...