आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार:सहा महिन्यांनंतर आरोपीच्या मुसक्या आवळल्या, दोन दिवसांची पोलिस कोठडी

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमाचा हवाला देत अल्पवयीन मुलीवर तिच्‍याच घरात बलात्‍कार करणाऱ्या तरुणाच्‍या पुंडलिकनगर पोलिसांनी तब्बल सहा महिन्‍यांनी मुसक्या आवळल्या. ऋषीकेश रविंद्र जाधव (२३, रा. पुंडलिकनगर) असे आरोपीचे नाव आहे. त्‍याला १७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश जिल्हा व सत्र न्‍यायाधीशांनी दिले आहेत. मुलीच्‍या वडीलांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

तक्रारीनुसार, सहा महिन्यापूर्वी पीडितेच्या घरातील सर्वजण हे जेवण करुन झोपले होते. मध्‍यरात्री एक वाजेच्‍या सुमारास पीडीता घरात न दिसल्याने वडिलांनी घराबाहेर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजा बाहेरुन लावलेला असल्याने वडिलांनी खिडकीत हात घालून दरवाजा उघडला. तेव्‍हा घरापासून काही अंतरावर पीडिता व आरोपी उभे दिसले. वडिलांनी त्‍यांना पकडण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, दोघांनी तेथून धूम ठोकली.

नोव्हेंबरपासून भेटीगाठी

तपासादरम्यान पोलिसांनी पीडितेला ताब्यात घेत चौकशी केली. यादरम्यान तिने सांगितले, आई-वडीलांचे नेहमी भांडण होत असल्याने ते वेगवेगळे राहतात. पीडिता ही आईकडे राहण्‍यासाठी होती. मात्र ४ डिसेंबर रोजी पीडितेचे आईसोबत भांडण झाल्याने पीडिता वडीलांकडे राहण्‍यासाठी आली होती. नोव्‍हेंबर २०२१ पासून पीडिता व आरोपी हे एकमेंकाना ओळखत होते. त्‍यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. तेव्‍हापासून ते ऐकमेकांना भेटत होते.

...म्हणून पीडिताही पळाली

पीडिता वडीलांकडे राण्‍यासाठी आल्यानंतर पीडितेने आजीच्‍या मोबाइल वरुन आरोपीला फोन करुन भेटण्‍यासाठी बोलावले. त्‍यानूसार रात्री १२ वाजेच्‍या सुमारास आरोपी पीडितेला भेटण्‍यासाठी आला. पीडितेने घराच्या दरवाजाला बाहेरुन कडी लावली व गेटचे कुलूप उघडून घराच्‍या तळमजल्‍यात आरोपीला थांबवले. तेथे आरोपीने प्रेमाचा हवाला देत तिच्‍यावर बलात्‍कार केला. एक वाजेच्‍या सुमारास पीडितेला तिच्‍या वडीलांचा आवाज आल्याने दोघे घाबरले. आरोपीला तेथुन पळून जाताना वडिलांनी पाहिले. दुसरीकडे वडील आपल्याला मारतील या कारणामुळे पीडितेने देखील घरातून पळ काढला.

सीसी टीव्ही फुटेज तपासणार

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागुल यांनी गुन्‍ह्यातील सीसी टीव्‍ही फुटेजचा तपास करायचा आहे. गुन्‍हा करतेवेळी आरोपीने परिधान केलेले कपडे जप्‍त करायचे आहेत. आरोपीला गुन्‍ह्यात कोणी मदत केली काय याचादेखील तपास करायचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली होती.

बातम्या आणखी आहेत...