आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:जिल्ह्यातील मोठ्या लोकसंख्येच्या गावात रॅपिड अँटीजन कॅम्प सुरू होणार : जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची माहिती

हिंगोली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची त्वरित माहिती मिळावी यासाठी मोठ्या लोकसंख्येच्या गावांमधून रॅपिड अँन्टीजन कॅम्प सुरू केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारी ता. २९ दिव्य मराठीशी बोलतांना दिली आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सांगितले की हिंगोली शहरासह जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसात कोरणा बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे रुग्णालयावर रुग्णांचा मोठा भार पडू लागला आहे. दररोज रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही त्या तुलनेत अधिकच चांगले आहे. मात्र कोरोना बाधित रुग्णांची लवकर माहिती मिळावी व त्यांना तातडीने उपचार मिळावे यासाठी मोठ्या लोकसंख्येच्या गावांमधून रॅपिड अँटीजन चाचणी सुरू करण्याचे नियोजन झाले आहे. त्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग व शासकीय रुग्णालय यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. या शिबिरातून रुग्णांची माहिती लवकर मिळणार असल्याने कोरोना बाधित रुग्णांकडून इतरांना होणारा संसर्ग रोखण्याचे प्रयत्न असणार आहेत.

याशिवाय जिल्ह्यातील 650 ठिकाणी ऑक्सिजन बीएड आहेत मात्र काही ठिकाणी ऑक्सिजनची पातळी चांगली असतानाही रुग्णांना ऑक्सीजन बेडवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अनेक वेळा ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना तातडीने ऑक्सीजन देता येणे कठीण झाले आहे. त्यासाठी आताच स्वतंत्र पथक नियुक्त करून ऑक्सीजन बेडवर असलेल्या सर्व रुग्णांची ऑक्सिजन पातळी तपासून ज्यांना ऑक्सिजनची गरज नाही त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये हलविले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात तीन खाजगी कोविड केअर सेंटरला मान्यता देण्यात आली आहे. या . ठिकाणीही गंभीर लक्षणे नसणारे रुग्ण पाठवले जाणार आहेत. जिल्ह्यात सोमवारपासून ता. २९ संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्यातून विनाकारण फिरला यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला दिले आहेत. त्यानुसार पोलीस विभागाकडून कारवाई देखील सुरू आहे. मात्र नागरिकांनी संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहनही जयवंशी यांनी केले आहे

बातम्या आणखी आहेत...