आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय युवा संसद:सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचा वेगाने विकास : डॉ. कराड

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्व क्षेत्रात विकसित होत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी येथे केले. महाराष्ट्र विधि विद्यापीठात आयोजित भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय युवा संसद २०२३ आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते.

विद्यापीठातील युवक संसद कार्यक्रमास महाराष्ट्र विधी विद्यापीठाचे कुलगुरू के. वी. सामा, कुलसचिव धनाजी जाधव, प्रा. प्रफुल्ल लेले, अशोक वडजी, प्रा. आनंद जय शेट्टी यांच्यासह मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. युवा संसद २०२३ या वक्तृत्व स्पर्धेत संपूर्ण भारतात १०७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्रामुख्याने लोकसभा, नीती आयोग, संसद या वेगवेगळ्या विषयांवर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. संसद विधिमंडळे, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि माध्यमे हे लोकशाहीची चार स्तंभ स्वतंत्ररीत्या कार्यरत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा सर्वांगीण विकास होत आहे, असे डाॅ. भागवत कराड यांनी सांगितले.

संसदेच्या कामकाजाची विद्यार्थ्यांना दिली माहिती यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये वेगवेगळ्या आयुधांचा वापर कशा पद्धतीने करण्यात येतो, प्रामुख्याने शून्य प्रहार, प्रश्नोत्तर तास आणि विशेष चर्चा या संसदेमध्ये कशा पद्धतीने होतात, लोकशाहीमध्ये सर्वात श्रेष्ठ स्थान असलेल्या संसदेमधून शेवटी कायदे कसे तयार होतात याची माहिती दिली.