आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य:उजव्या बाजूच्या हृदयावर दुर्मिळ अँजिओप्लास्टी यशस्वी, धूत रुग्णालयात पार पडली सातवी शस्त्रक्रिया

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेठ नंदलाल धूत रुग्णालयात उजव्या बाजूला हृदय असलेल्या रुग्णाची दुर्मिळ अशी अँजिओप्लास्टी यशस्वीरीत्या पार पडली.

बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील पिरे-तरिकत अल्लामा सय्यद अबुबकर अहमद कादरी यांना छातीत दुखत होते. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला बऱ्हाणपूर व जळगाव येथे उपचार घेतले तसेच तेथील डॉक्टरांच्या सांगण्यावरुन काही तपासण्याही केल्या. तपासणीदरम्यान त्यांचे हृदय उजव्या बाजूला (डेक्स्ट्रोकार्डिया) आढळून आले. १० हजार व्यक्तींमध्ये एका व्यक्तीचे हृदय उजव्या बाजूला असते. या उलट्या बाजूला असलेल्या हृदयाची अँजिओप्लास्टी करणे खूप अवघड असते. धूत रुग्णालयामध्ये ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. यापूर्वीही धूतमध्ये अशा सहा शस्त्रक्रिया पार पडल्या होत्या.

रुग्णाच्या हृदयाच्या तिन्ही रक्तवाहिन्यात ब्लॉकेजेस होते. त्यातील एका रक्तवाहिनीचा ब्लॉक खूप जुना होता. त्यापुढील स्नायू जवळजवळ निकामी झाले होते. म्हणून उर्वरित दोन रक्तवाहिन्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. धूत हॉस्पिटलचे कार्डिओलॉजी विभागप्रमुख व वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विलास मगरकर ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. त्यात त्यांना डॉ. देवेंद्र बोरगावकर, डॉ. मुनीर अहमद यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...