आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौताळा परिसरात दुर्मिळ 'काळा गरुड':भारतात तुरळक नोंदी, शिकारी पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रशासनाने योग्य पाऊले उचलावी

औरंगाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्ह्यातील गौताळा वन्यजीव अभयारण्यात भारतीय काळा गरुड हा दुर्मिळ पक्षी आढळून आला आहे. हा पक्षी आकाराने घारीपेक्षा मोठा असून काळसर वर्णाचा असतो. औरंगाबाद जिल्ह्यात इतरत्र आधीही हा पक्षी दिसल्याचे पक्षी अभ्यासक सांगतात. परंतु गौताळा अभयारण्यातील या पक्षाची ही पहिलीच नोंद आहे. याच्या महाराष्ट्रात व भारतात अतिशय तुरळक नोंदी आहेत.

पक्षी अभ्यासक कुणाल विभांडीक आणि संशोधक शैलेश आढाव, गोरक्षनाथ वाघ हे फुलपाखरांवरील अध्ययनाकरिता जंगलात गेले असता त्यांना हा भारतीय काळा गरुड दिसून आला. यावेळी वनविभागाचे गस्तीवरील वनरक्षक राठोड, अमोल सोनवणे हे देखील याठिकाणी उपस्थित होते. या संदर्भातली माहिती विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे यांना कळविण्यात आली आहे. अशा शिकारी पक्ष्यांच्या संवर्धनाकरिता प्रशासनाने योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे, असे मत पक्षीप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे.

पक्षी अभ्यासक फुलपाखरांवरील अध्ययनाकरिता जंगलात गेले होते.
पक्षी अभ्यासक फुलपाखरांवरील अध्ययनाकरिता जंगलात गेले होते.

दुर्मिळ पक्ष्यांनी यावे

अशा दुर्मिळ प्राणी आणि पक्षांच्या दर्शनामुळे गौताळा अभयारण्य आणि तेथील अनन्यसाधारण वनसंपदा यांचे महत्व अधोरेखित होत आहे. जसा वाघ या जंगलात रमला आणि राहिला तसेच इतर दुर्मिळ पक्षी, प्राणी आणि जैवसंपदेने गौताळ्याला आपले घर बनवावे अशी इच्छा सर्व निसर्गप्रेमी व्यक्त करत आहे.

याठिकाणी आढळतात

हे पक्षी हिवाळ्यात पाकिस्तानच्या रावळपिंडी जिल्ह्यात आढळतात. याशिवाय भूतान आणि भारतातील अरुणाचल प्रदेश तसेच ब्रह्मपुत्रेच्या दक्षिणेकडील पर्वत आणि कन्याकुमारी, श्रीलंकेकडील डोंगराळ भूप्रदेशातही आढळतात. दक्षिणेकडे नोव्हेंबर ते मार्च या काळात आणि उत्तरेकडे जानेवारी ते एप्रिलमध्ये आढळतात .

काळ्या गरुडाची वैशिष्ट्ये

  • गरुड जातीतील हा मोठ्या आकाराचा पक्षी संपूर्ण काळ्या रंगाचा असतो. पंखांच्या खाली आणि शेपटीवर बारकाईने लक्ष दिल्यास पुसटसे पांढरे ठिपके दिसून येतात.
  • याची चोच आणि पाय प्रामुख्याने पिवळे असतात. ते चटकन दिसून येतात. चोच संपूर्ण पिवळी आणि टोकावर काळी असते.
  • याचे शास्त्रीय नाव ‘इक्टिनिट्स मलाइन्सिस’ असे असून, हा पक्षी भारतात स्थानिक पक्षी आहे.
  • सामन्यातः हा पक्षी डोंगर दऱ्यांमध्ये आढळून येतो.
  • भारतीय काळा गरुड सरडे, साप, उंदीर, घुशी तर वेळप्रसंगी इतर लहान पक्ष्यांची आणि लहान प्राण्यांची शिकार सुद्धा करतो.
  • अत्यंत समृद्ध जंगलात आणि कडेकपारी तसेच शिखरमाथे असलेल्या भागात हा भारतीय काळा गरुड प्रामुख्याने वास्तव्यास असतो. यामुळेच याचे दर्शन दुर्मिळ असते.

ही फुलपाखरे आढळली

गौताळा अभयारण्य हे औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले अभयारण्य आहे. औरंगाबादपासून 65 कि.मी अंतरावर असलेले हे अभयारण्य जैवविविधतेच्यादृष्टीने अतिशय श्रीमंत आहे. विविध प्रजातींची वृक्षराजी, प्राणी आणि पक्ष्यांचा अधिवास असलेले 261 चौ.कि.मी.चे हे क्षेत्र आहे. येथे लाल बुड्या, बुलबुल, साळुंकी, जंगली मैना, लहान तपकिरी, होला, दयाळ, कोकिळा पावश्या, टकाचोर, भारद्वाज, माळ टिटवी, वेडा राघू कोतवाल, चिरक असे पक्षी

बातम्या आणखी आहेत...