आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चातुर्मास:राष्ट्रसंत आचार्य पुलकसागर महाराजांचा औरंगाबादेत 17 जुलैपासून चातुर्मास

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रसंत आचार्य पुलकसागर महाराज यांचा २०२२ चा चातुर्मास औरंगाबाद शहरातील खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर राजाबाजार येथे होणार आहे, अशी माहिती पंचायत अध्यक्ष ललित पाटणी, सचिव अशोक अजमेरा, उपाध्यक्ष विनोद लोहाडे, सहसचिव नरेंद्र अजमेरा यांनी दिली आहे. आचार्य पुलकसागर महाराज यांना श्रीरामपूर येथे औरंगाबाद राजाबाजार जैन पंचायतीच्या विश्वस्त कार्यकारिणी मंडळाने चातुर्मासासाठी श्रीफळ अर्पण केले. या वेळी पंचायत अध्यक्ष ललित पाटणी, जैन समाजाचे महासचिव महावीर पाटणी, महामंत्री अशोक अजमेरा, उपाध्यक्ष विनोद लोहाडे, पुलक मंच राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुनील काला, एम.आर.बडजाते, महेंद्र ठोले, प्रकाश अजमेरा, डॉ.रमेश बडजाते, आनंद सेठी, अ‍ॅड. अनिल कासलीवाल, प्रसाद पाटणी यांची उपस्थिती होती. आचार्य पुलकसागर महाराजांचे श्रीरामपूर, भानशिवरा, पैठण, कचनेर, धर्मतीर्थ, गाडीवाट मार्गाने ३ जुलै रोजी राजाबाजार जैन मंदिरात आगमन होणार आहे. १७ जुलै रोजी चातुर्मास कलशाची स्थापना होणार आहे, अशी माहिती प्रचार-प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा व पीयूष कासलीवाल यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...