आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना स्वस्त दराने गहू, तांदूळ देणे थांबवून ‘डीबीटी’च्या माध्यमातून बँक खात्यात पैसे जमा करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर रेशन दुकानदार संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. याविरोधात रेशन दुकानदार संघटना उच्च न्यायालयात दाद मागणार असून रस्त्यावर उतरूनदेखील आंदोलन केले जाणार असल्याचे राज्याच्या रेशन असोसिएशनचे अध्यक्ष डी. एन. पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. राज्य शासनाने १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना २४ जुलै २०१५ पासून दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ देण्यात येतात. त्यामध्ये मराठवाड्यातील आठ जिल्हे आणि विदर्भातील सहा जिल्ह्यांचा समावेश होता.
५५ हजार दुकानदारांना फटका रेशन दुकानदारांना एका क्विंटलमागे दीडशे रुपये इतके कमिशन मिळते. त्यामुळे हे कमिशन आता बंद होणार आहे. त्याचा फटका राज्यातील ५५ हजार तसेच मराठवाड्यातल्या ११ हजार रेशन दुकानदारांना बसणार आहे. राज्यात या योजनेच्या माध्यमातून दरमहा १९,९८६ टन धान्य वाटप करण्यात येते. यामध्ये गहू १२,६५५ टन, तर तांदूळ ७३११ असे धान्य दरमहा वितरित केले जाते.
रेशन दुकानदार संघटना रस्त्यावर, न्यायालयीन लढाई लढणार आम्ही सुरुवातीपासून या योजनेला विरोध केला आहे. त्यामुळे याविरोधात रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाईदेखील लढली जाणार आहे. लवकरच आम्ही सर्व संघटनांची बैठक घेऊन त्याबाबत रूपरेषा ठरवणार आहोत. - डी. एन. पाटील, राज्य अध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना
रेशन व्यवस्था संपवण्याचा डाव रेशन दुकानदार संघटनेेचे राज्याचे अध्यक्ष पाटील म्हणाले की, शासनाने ‘डीबीटी’ लावावे, अन्यथा कोणतीही पद्धत आणावी. मात्र, रेशन दुकानदारांच्या पोटावर पाय देऊ नये. केंद्र सरकार महाराष्ट्रात ‘पायलट प्रोजेक्ट’ राबवत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास रेशनिंग व्यवस्थाच संपवण्याचा घाट घालत आहे. त्यामुळे आम्हाला दरमहा ५० हजार रुपये मानधन द्यावे. रेशन व्यवस्था संपवण्याचा डाव रेशन दुकानदार संघटनेेचे राज्याचे अध्यक्ष पाटील म्हणाले की, शासनाने ‘डीबीटी’ लावावे, अन्यथा कोणतीही पद्धत आणावी. मात्र, रेशन दुकानदारांच्या पोटावर पाय देऊ नये. केंद्र सरकार महाराष्ट्रात ‘पायलट प्रोजेक्ट’ राबवत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास रेशनिंग व्यवस्थाच संपवण्याचा घाट घालत आहे. त्यामुळे आम्हाला दरमहा ५० हजार रुपये मानधन द्यावे. रेशन दुकानदार संघटना रस्त्यावर, न्यायालयीन लढाई लढणार आम्ही सुरुवातीपासून या योजनेला विरोध केला आहे. त्यामुळे याविरोधात रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाईदेखील लढली जाणार आहे. लवकरच आम्ही सर्व संघटनांची बैठक घेऊन त्याबाबत रूपरेषा ठरवणार आहोत. - डी. एन. पाटील, राज्य अध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना
५५ हजार दुकानदारांना फटका रेशन दुकानदारांना एका क्विंटलमागे दीडशे रुपये इतके कमिशन मिळते. त्यामुळे हे कमिशन आता बंद होणार आहे. त्याचा फटका राज्यातील ५५ हजार तसेच मराठवाड्यातल्या ११ हजार रेशन दुकानदारांना बसणार आहे. राज्यात या योजनेच्या माध्यमातून दरमहा १९,९८६ टन धान्य वाटप करण्यात येते. यामध्ये गहू १२,६५५ टन, तर तांदूळ ७३११ असे धान्य दरमहा वितरित केले जाते.
रेशन दुकानदार राज्यभर आंदोलन करणार : डी. एन. पाटील असे आहेत लाभार्थी छत्रपती संभाजीनगर ३५८०९१ जालना - १४३०१२ नांदेड - ३,८४,८६२ बीड - ५,५३,५२६ धाराशिव - २,५०,८८१ परभणी - २,५३,७८४ लातूर - २,९९,९३६ हिंगोली - १,६९,५२५ अमरावती -५,०३,४१९ वाशिम -९९,७१३ अकोला -१,९२,५५४ बुलडाणा -३,७२,०२३ यवतमाळ -३,५८,९९६ वर्धा -५६,७८२ एकूण – ३९,९७,१८३
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.