आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकास्त्र:राज्यात शेतकऱ्यांवर संकट ओढावलेले असताना अयोध्या दौरा; महाराष्ट्राची रोम सारखी अवस्था, रविकांत तुपकरांचा हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिवंत माणसे सोडायची आणि देवाच्या दर्शनाला जायचे यापेक्षा पुढच्या महिन्यात अयोध्येला जाता आले असते. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा आणि आर्थिक मदत द्या, अन्यथा पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या आक्रमक आंदोलनाला सरकारला सामोरे जाव लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे अयोध्येत जंगी स्वागत करण्यात येत आहे. या अयोध्या दौऱ्याची मोठी चर्चाही सुरू आहे. तर इकडे महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

शिंदेंची रोमच्या राजाशी तुलना

याच मुद्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. आक्टोबर आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाईची मदत अद्याप मिळाली नाही. आता पुन्हा एकदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही आयोध्या दौऱ्यावर आहेत. यावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना रोमच्या राजाशी करत या दौऱ्यावर निशाणा साधला आहे.

अयोध्याचे दर्शन उशिराही घेता आले असते

रविकात तुपकर पुढे बोलताना म्हणाले की, रोम जळत असताना रोमचा राजा बिगुल वाजवत बसला होता. तशी अवस्था महाराष्ट्राची झाली आहे, इकडे राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पण मुख्यमंत्री तिकडे आपल्या आमदारांबरोबर अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांना अयोध्याचे दर्शन उशिराही घेता आले असते. सध्या शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम सरकारच होते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.