आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र राज्य हॅण्डबॉल संघटनेची निवडणूक बिनविरोध:मुंबईचे गायकवाड अध्यक्षपदी; तर पुण्याचे राऊत यांची सचिवपदी निवड

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य हॅण्डबाॅल संघटनेची पुणे येथे 'टेरी टी' हॉटेलमध्ये नुकतीच निवडणूक पार पडली. बहुमत असतानाही रूपेश मोरे यांच्या गटाने निवडणूक बिनविरोध करत राज्य संघटनेवर आपले वर्चस्व राखले. मुंबईच्या रवींद्र गायकवाड यांची अध्यक्षपदी, तर महासचिवपदी राजेंद्र राऊत यांची सर्वोनुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. रूपेश मोरे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून विराजमान झाले आहेत. पुणे जिल्ह्याने संघटनेचे नेतृत्व केले आहे. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून दीपक जवंजाळ यांनी सर्व प्रक्रिया पार पाडली. निरीक्षक म्हणून हॅण्डबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे कोशाध्यक्ष आनंदेश्वर पांडे आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे कोशाध्यक्ष अ‍ॅड. धनंजय भोसले हे उपस्थित होते. ‘महाराष्ट्रात प्रचंड गुणवत्ता आहे. महाराष्ट्र हॅण्डबॉलला पुन्हा एकदा गत वैभव प्राप्त करुन द्यावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय संघटनेचे कोशाध्यक्ष आनंदेश्वर पांडे यांनी केले.’

संघटनेचे नुतन पदाधिकारी :

अध्यक्ष - रवींद्र गायकवाड (मुंबई), सचिव - राजेंद्र राऊत (पुणे), वरिष्ठ उपाध्यक्ष - रूपेश मोरे (पुणे), उपाध्यक्ष - शकंर शहाणे (परभणी), सहसचिव - सुनील सुरकुटे (लातूर), सदस्य - प्रा. एकनाथ साळुंके, (औरंगाबाद) डाॅ. महेश राजेनिबांळकर (उस्मानाबाद), भालचंद्र पवार (परभणी), कुलदीप सावंत (उस्मानाबाद), नाना साबळे (बीड), विलास नागेश्ववर ( नांदेड), बळवंत निकुंब (नंदुरबार), रविकिरण सुरूडकर (सिंधुदुर्ग).

प्रत्येक जिल्ह्यात सुविधा निर्माण करणार

एकेकाळी महाराष्ट्र हॅण्डबॉलमध्ये अव्वल होता. आजही उत्कृष्ट खेळाडू आपल्या राज्यातील कानाकोपऱ्यात आहेत. प्रत्येक जिल्ह्यात खेळाच्या सुविधा निर्माण करण्याचा आम्ही संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करू. खेळात मागे असलेल्या जिल्ह्यात दर्जा वाढवण्यासाठी नियोजन करणार आहोत, असे नूतन अध्यक्ष रवींद्र गायकवाड यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

बातम्या आणखी आहेत...