आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावित्रीबाई फुले मंडळाचे पुरस्कार वितरित:मुंबईचे रवींद्र गोळे आणि परभणीच्या श्रीलेखा वझे यांच्या कामाची दखल घेत केला गौरव

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळातर्फे मुंबईचे रवींद्र गोळे यांना डॉ. भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार, तर परभणीच्या श्रीलेखा वझे यांना डॉ. रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार रविवारी प्रदान करण्यात आले. यावेळी जेष्ठ प्रचारक शरदराव ढोले, ऊद्योजक पुखराज पगारीया उपस्थित होते. प्रा. डॉ. सोमनाथ खाडे यांनी प्रास्ताविक केले. ज्योती शितोळे, डॉ. प्रतिभा फाटक यांनी मानपत्राचे वाचन केले. ढोले म्हणाले, ‘पुरस्कार मिळावा म्हणून काम करण्यापेक्षा आनंद आणि समाधानासाठी काम करा. डॉ. सुहास अजगावकर यांनी आभार मानले. कृत्तिका तुपकरीच्या पसायदानाने सांगता झाली.

सत्काराला उत्तर देताना श्रीलेखा वझे म्हणाल्या, माझ्या पूर्णवेळ सामाजिक कामात सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ आणि स्व. प्रल्हादजी अभ्यंकर यांचा मोठा वाटा आहे. रवींद्र गोळे म्हणाले, ‘ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो, त्या डॉ. भीमराव गस्ती यांच्यासोबत ५ वर्षे काम करताना मला समरसतेचा धागा गवसला. समाज परिवर्तनाचा हाच एकमेव मार्ग आहे.

बातम्या आणखी आहेत...