आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एएसआर लीग:रेयॉन वॉरियर्स संघ विजयी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एएसआर मसिआ प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत स्वजीत मीडिया इलेव्हन, दिग्विजय मार्व्हल्स, रेयॉन वॉरियर्स, सिमेन्स सनरायजर्स संघांनी विजय मिळवला. एमजीएम मैदानावर आयोजित स्पर्धेत एकूण १२ संघांनी सहभाग नोंदवला आहे. यादरम्यान स्पर्धेचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी एडीसीचे सचिव सचिन मुळे, मसिआचे अध्यक्ष किरण जगताप, श्रीधर नवघरे, मंगेश निटुरकर, अमित राजळे, राहुल घोगरे, संदीप पाटील आदींची उपस्थिती होती.

गजानन चमकला : रेयॉन वॉरियर्सने एंड्रेस इलेव्हनवर ६ गडी राखून मात केली. प्रथम खेळताना एन्डरेसने १५ षटकांत ७ बाद ८९ धावा उभारल्या. जयेश पोकळेने ३९, बिपिन कुमारने १८ धावा जोडल्या. रायोनकडून गजानन भानुसेने ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात रेयॉनने १३.४ षटकांत ४ गडी गमावत विजयी साकारला. सलामीवीर अजित मुळेने नाबाद ४१ धावांची िवजयी खेळी केली. सिमेन्सचा सारा थंडरवर विजय : सिमेन्सने सारा थंडर वोल्ससवर ५९ धावांनी मात केली. सिमेन्सने ५ बाद १३२ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात, साराचा ७३ धावांवर डाव संपुष्टात आला.

बातम्या आणखी आहेत...