आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करा किंवा मरा:पाकिस्तानच्या ग्वादरमध्ये बंडाळी ; बलूच संघटनांचा आजपासून सीपॅक बंद करण्याचा इशारा

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानातील चीनचा ड्रीम प्रोजेक्ट सीपॅकच्या (चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर) विरोधात ग्वादरमध्ये असंतोष पाहायला मिळू लागला आहे. स्थानिक बलूच नागरिकांच्या हितावरील चीनच्या आक्रमणाला तीव्र विरोध दिसतो. तीन आठवड्यांपासून लोक रस्त्यावर ठिय्या मांडून आहेत. त्यात पहिल्यांदाच मोठ्या संख्येने महिला-मुलेही सहभागी झाली. जमात-ए-इस्लामीचे प्रमुख रहेमान बलुच यांनी एक इशारा दिला आहे. रविवारपासून बलुचमधून सीपॅक प्रकल्प बंद करून ग्वाडेर एक्स्प्रेस वे देखील बंद करण्याचे आवाहन त्यांनी केले.करा किंवा मरा अशी घोषणाच जमात-ए-इस्लामीने दिली आहे. एकाच वर्षात दुसऱ्यांदा होत असलेल्या या आंदोलनामुळे शाहबाज सरकार घेरल्या गेले आहे. ग्वाडेरमध्ये आंदोलनामुळे अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आली आहे. पंजाब तसेच इतर राज्यांतून जास्त पोलिस मागवण्यात आली.

ग्वाडेरवर वर्चस्वामुळे आम्ही घरातच कैदी जमातचे प्रमुख रहेमान बलुच म्हणाले, चीनने संपूर्ण ग्वाडेरवर वर्चस्व मिळवले. ठिकठिकाणी चिनी तपास नाके आहेत. बलुचच्या नागरिकांना बाहेर जाण्यापूर्वी येथे आपली ओळख पटवून द्यावी लागते. महिलांची तपासणी होते. आम्ही आमच्याच घरात कैद झालो आहोत. हे सहन केले जाणार नाही.

भविष्यावरील संकटामुळे आंदोलनात मुलेही मच्छिमार संघटनेचे नेते केडी काजू म्हणाले, ग्वादरच्या ९० टक्के जनतेचा उदरनिर्वाह मासेमारीवर अवलंबून आहे. चीनचे ट्रोलरचे समुद्रावर वर्चस्व आहे. मुलांसाठी उदरनिर्वाहाचे साधनच राहणार नसल्यामुळे लहान मुलेही आंदोलनात सहभागी झाले आहेत. कारण त्यांचे भविष्य संकटात आहे.

जिनपिंग यांचे मन वळवण्याचे प्रयत्न बलुचिस्तानमधील जनआंदोलनाकडून दुर्लक्ष करून पंतप्रधान शाहबाज शरीफ चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडेच शाहबाज चीनच्या दौऱ्यावर गेले होते. बलुचमध्ये सीपॅकमध्ये काम करणाऱ्यांना सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शाहबाज यांनी या भेटीत दिले होते. जिनपिंग यांच्या सुचनेवरून सीपॅकमध्ये अफगाणिस्तानचाही समावेश करण्याचे शाहबाज यांनी ठरवले आहे. सीपॅकवर पाकिस्तान नाराजी व्यक्त करू शकत नाही. त्यात पाकचा नाईलाज आहे. चीनकडून मिळणारे स्वस्त कर्ज, सैन्याचे चीनवरील अवलंबित्व यामुळे शाहबाज जिनपिंग यांना नाराज करू इच्छित नाही. एवढेच नव्हे तर उभय देशांतील व्यापारासाठी लागणारा पैसा युआनमध्ये देण्यासाठी देखील तत्वत: मान्यता दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...