आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:खोट्या खरेदीखताद्वारे दोन एकर जमिनीची परस्पर विक्री; तलाठी, मंडळ निरीक्षकासह पाच जणांविरोधात गुन्हा

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवृत्त पोलिस उपअधीक्षकाच्या मेहुण्याची शरणापूर येथील दोन एकर जमीन तलाठी, मंडळ निरीक्षकासह पाच जणांनी बनावट कागदपत्रांआधारे खरेदीखत बनवून परस्पर विकली. याप्रकरणी आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबासाहेब विठ्ठलराव सरवदे (५०, रा. ढोरगाव, ता. माजलगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार त्यांचे मेहुणे निवृत्त पोलिस उपअधीक्षक एम. एम. मुळे यांच्या मध्यस्थीने ९ जानेवारी २००६ रोजी शरणापूर (ता. औरंगाबाद) शिवारातील गट नं. ५७ मध्ये ८७ आर जमीन छावणी येथील अशपाक हमीद आणि मिनाज हमीद यांच्याकडून खरेदी केली होती. १ मार्च २०२२ रोजी सरवदे यांना फोन आला आणि तुमची शरणापूरची जमीन विकली काय, असे विचारले. तसेच सरवदे यांच्या मोबाइलवर सातबारा टाकला. यानंतर सरवदे यांनी भाऊ सदाशिव सरवदे आणि मुळे यांना सांगितले.

खोट्या कागदपत्रांच्या व तलाठ्याने केलेल्या सातबाराच्या आधारे कल्याण कान्हेरे, विनोद इंगळे व काही ब्रोकर ही जमीन विजय एकनाथ साळे, किशोर भीमराव म्हस्के आणि विष्णू जगताप यांना विकण्याच्या तयारीत असल्याचे मुळे यांना कळले. यानंतर सरवदे यांनी जमीन खरेदी करणाऱ्या लोकांना भेटून त्यांना सर्व खरी माहिती दिली. तसेच कान्हेरे यांच्याकडे असलेले खरेदीखत बनावट असल्याचे सांगितले. तसेच दौलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार याप्रकरणी बुधवारी (३० मार्च) कल्याण रामचंद्र कान्हेरे, विनोद नारायण इंगळे, रवी विष्णू साळवे, रमेश राजेंद्र पांडे, तलाठी दिलीप जाधव, मंडळ निरीक्षक एल. जी. गाडेकर व अनोळखी ब्रोकर, खोटी कागदपत्रे तयार करणारे यांच्याविरोधात दौलताबाद पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

रजिस्ट्री कार्यालयात जाऊन पाहणी केल्यानंतर समोर आला प्रकार
मुळे यांनी याबाबत माहिती घेतली. त्यानुसार ३ मार्च रोजी या जमिनीचे कल्याण कान्हेरे आणि विनोद इंगळे यांच्या नावे खरेदीखत झाल्याचे दिसून आले. त्याआधारे करोडी येथील तलाठ्याने कान्हेरे आणि इंगळे यांच्या नावाचा सातबारा बनवला होता. पण सरवदे यांनी जमीन विकली नसल्याचे सांगितले. त्यावर मुळेंनी रजिस्ट्री कार्यालयात जाऊन पाहणी केली. तेव्हा १३ एप्रिल २००९ रोजी केलेले खरेदीखत बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

बातम्या आणखी आहेत...