आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी जबाबदार की आम्ही?:औरंगाबादेत रेकॉर्डब्रेक 1335 रुग्ण; 18 मृत्यू, उद्यापासून रात्री आठनंतर शहरात संचारबंदी

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विदर्भात ४७ मृत्यू, तब्बल ६३८२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

मराठवाड्यात बुधवारी तब्बल ३३२२ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. ३२ रुग्णांचा मृत्यू झाला. १३२० जण बरे होऊन घरी परतले. सध्या १६ हजार ३३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक १३३५, जालना ५५२, परभणी २३५, हिंगोली ५४, नांदेड ५९७, लातूर १८९, उस्मानाबाद ९४, बीडमध्ये २६६ रुग्ण आढळले. औरंगाबादेतच सर्वाधिक १८ मृत्यू, नांदेडमध्ये ६, जालना ४ व बीड, हिंगोलीत २ व परभणीत १ मृत्यू झाला. दरम्यान, औरंगाबादेत उद्यापासून रात्री आठनंतर पहाटे ५पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

विनामास्क मंत्री महाद्वय, मतदारांची तरी काळजी घ्या!
जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचारासाठी बोरदहेगाव (ता. वैजापूर) येथे बुधवारी मतदार संपर्क मेळावा झाला. त्यात मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार विनामास्क सहभागी होते. लोकांना ‘जबाबदारी’चे डोस पाजणाऱ्या लोकप्रतिनिधींकडूनच असे बेजबाबदार वर्तन हाेत असेल तर त्यांना दंड ठोठावण्याचे धाडस प्रशासन दाखवणार आहे का? या नेत्यांना स्वत:च्या नसेल पण मतदारांच्या जिवाची तरी पर्वा अाहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

विदर्भात ४७ मृत्यू, तब्बल ६३८२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

अमरावती | विदर्भात बुधवारी तब्बल ४७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, तर ६३८२ नवे रुग्ण आढळले. मृतांत नागपूर जिल्ह्यातील १६, तर वर्धा ६, चंद्रपूर २, गडचिरोली २, अकोला-अमरावतीतील प्रत्येकी ६, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येकी ४, तर वाशीममधील एकाचा समावेश आहे. नागपूर विभागात बुधवारी ४१३४, तर अमरावती विभागात २२४८ नवे रुग्ण आढळले. अमरावती विभागातील बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक ६९० नवे रुग्ण आढळले, तर अमरावती ४०६, अकोला ४७०, यवतमाळ ४३५ आणि वाशीम जिल्ह्यात २४७ नवे रुग्ण आढळले. एकूण १९४४ मृत्यू झाले. एकूण बाधितांची संख्या १ लाख २७ हजार ८६६ असून ८५.३१% रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...