आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्याची विशेष मुलाखत - आर.के. बन्सल:2014 नंतर 100% पर्यंत अनुत्पादक कर्जाची वसुली

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भीम सिंह| एनपीए (अनुत्पादक कर्ज) हे देशाच्या बँकिंग व्यवस्थेत एकेकाळी मोठे आव्हान होते. अलीकडच्या वर्षांत हे प्रमाण कमी झाले आहे. बुडीत कर्जांची वसुली करण्यासाठी बँका मालमत्ता पुनर्रचना कंपन्यांची (एआरसी) मदत घेत आहेत. एडलवाइस एआरसीचे एमडी आणि सीईओ आर .के. बन्सल म्हणतात की, २०१४ पासून परिस्थिती खूप बदलली आहे. आता एनपीएची वसुली १००% पर्यंत आहे.

बँकांना एआरसीच्या सेवांची आवश्यकता का आहे?
रिझर्व्ह बँकेचे मत आहे की, अशा कर्जाच्या वसुलीचे काम बँकांनी करू नये, ज्यांना वसुलीत (एनपीए) अडचण येत आहे, त्यासाठी दुसऱ्या कंपनीची सेवा घ्यावी, जेणेकरून बँक मुख्य व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करू शकेल. परंतु या कार्याचा लाभ घेण्यासाठी एआरसीला हस्तांतरित मालमत्तेपैकी किमान १५% गुंतवणूक करावी लागते.

बँकाः एआरसीला मालमत्ता किती टक्के मूल्यावर विकतात?
एनपीए किती जुना आहे त्यावर ते अवलंबून आहे. ते ५-१०% पासून ८०% पर्यंत असू शकते. सर्वात कमी मूल्यांकन क्रेडिट कार्डच्या एनपीएचे आहे. तथापि एनपीएचे निव्वळ मालमत्ता मूल्य क्रेडिट एजन्सीद्वारे ठरवले जाते.

वसुलीच्या यशाचे प्रमाण किती? अंदाजे ३०-३५% ते ८०% वसुली होते. हे कर्जाच्या श्रेणीवर अवलंबून असते. उदाहरणार्थ ४०-७०% गृहकर्ज आणि ३०-४०% वाहन कर्ज. काही प्रकरणांमध्ये १००% वसुलीही होते. बिनानी सिमेंट हे त्याचे उदाहरण आहे. ढोबळपणे, आपण त्याचे दोन भाग करू शकतो. २०१४ पूर्वी १८-२०% वसुली असायची, पण २०१४ नंतर १००% पर्यंत वसुली होत आहे. एडलवाइस एआरसीने गेल्या ४ वर्षांत २५,००० कोटी रुपये वसूल केले आहेत.

दिवाळखोरी संहिता (आयबीसी) लागू झाली आहे का? या कायद्याचा मोठा फायदा झाला आहे. आधी वसुलीसाठी ७-८ वर्षे लागायची. आयबीसी आल्यानंतर २-३ वर्षांत वसुली होते.

बँका करू शकत नाहीत अशा वसुलीसाठी एआरसी काय करतात? बँका एनपीए झालेल्या कर्जांची पुनर्रचना करू शकत नाहीत. एआरसी हे करू शकते. कधी-कधी एनपीए खात्याला नवीन निधीची आवश्यकता असते. आम्ही अशा ग्राहकांना नवीन भांडवल पुरवतो, जेणेकरून त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि ते कर्जाची परतफेड करू शकतील. बँका हे करू शकत नाहीत.

जाणूनबुजून कर्ज चुकवणाऱ्या ग्राहकांशी तुम्ही कसे व्यवहार करता? एआरसी सामान्यतः बँकांकडून विलफुल डिफॉल्टर्सची मालमत्ता खरेदी करत नाहीत.

कोणत्या उद्योगात जास्त एनपीए प्रकरणे आहेत? तुम्हाला कोविडचा काही परिणाम दिसतो का? गेल्या ७-८ वर्षांपासून, एनपीएची अधिक प्रकरणे पोलाद, ऊर्जा आणि वस्त्र क्षेत्रातून येत आहेत. गेल्या २-३ वर्षांपासून एनबीएफसी आणि बँकांची कर्जेही एनपीए होऊ लागली आहेत. कोविडमुळे पर्यटन क्षेत्राची काही कर्जेही एनपीए झाली आहेत. पण एकूणच परिस्थिती सुधारत आहे. कर्ज वितरण वाढत आहे आणि एनपीए कमी होत आहे.

आर.के. बन्सल, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एडलवाइस एआरसी

बातम्या आणखी आहेत...