आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्युत सहायक भरती:तीन वर्षांपासून रखडलेली विद्युत सहायकांची भरती करा

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत तीन वर्षांपासून रखडलेली विद्युत सहायकांची भरती त्वरित करावी यासाठी प्रतीक्षा यादीतील तीनशेवर उमेदवारांनी गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ‘आम्ही ना मागतोय आमदारकी, ना मागतोय खासदारकी... आमची एकच आहे मागणी, आम्हाला द्या विद्युत सहायकपदी नियुक्ती,’ अशा प्रकारचे पोस्टर लक्षवेधी ठरत आहेत.

महावितरणने एप्रिल २०१९ मध्ये ५ हजार विद्युत सहायकांची भरती प्रक्रिया सुरू केली होती. १ ऑक्टोबर २०२१ रोजी न्यायालयात प्रलंबित याचिकेला अधीन राहून ४६६ जागा वगळून ४ हजार ५३४ जागांची निवड यादी प्रसिद्ध केली. त्यात १ हजार ६३३ पात्र उमेदवारांनाच नियुक्ती मिळाली. २ फेब्रुवारी २०२२ रोजी महावितरण कंपनीच्या नियमानुसार सामाजिक आरक्षणासहित २२६९ जागेची प्रतीक्षा यादी जाहीर करून २१२८ उमेदवारांची ३ व ४ मार्च रोजी कागदपत्रे पडताळणी केली. मात्र, निवड प्रक्रिया पूर्ण पार पाडली नाही. प्रतीक्षा यादी नियमात बदल करून अन्याय केला.

याविरोधात उमेदवारांनी २२ ते २४ ऑगस्ट तीन दिवस ठिय्या आंदोलनही केले होते. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे सरकारने मध्यस्थी करून महावितरणला प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना विद्युत सहायक म्हणून नोकरीत सामावून घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी उपोषणाला बसलेल्या उमेदवारांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...