आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य केंद्रे:मनपा आरोग्य विभागात 100 जागांसाठी भरती ; विविध संवर्गांतील 100 पदे भरली जाणार

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कंत्राटी स्वरूपात नोकरभरती केली जाणार आहे. यात डॉक्टर, परिचारिका, तंज्ञत्र यासह विविध संवर्गांतील १०० पदे भरली जाणार आहेत. यात डॉक्टरांच्या २० जागा आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव तयार झाला असून ही प्रक्रिया येत्या महिनाभरात पूर्ण करणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. शहरात महापालिकेची ४० आरोग्य केंद्रे आहेत. राज्य सरकारने काेराेनाकाळात महापालिकेला मेल्ट्रॉन कंपनीत ३०० खाटांचे हॉस्पिटल उभारून दिले आहे. कोरोनाचा संसर्ग संपल्याने सध्या तिथे ओपीडीच्या माध्यमातून सामान्य रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यासाठी तेथे आवश्यक यंत्रणाही उभारली आहे. मात्र, ही सर्व रुग्णालये चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागात सध्या केवळ ३५ डॉक्टर आहेत. काही आरोग्य केंद्रांत २-२ डॉक्टर नियुक्त असल्याने कित्येक आरोग्य केंद्रांत एकही डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने कंत्राटी स्वरूपात नोकरभरती करण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...