आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्यावश्यक पदांची यादी:मनपात 900 जागांवर होणार भरती, पहिल्या टप्प्यात ‘अनुकंपा’तील 55 जणांना संधी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मनपाच्या नोकरभरतीला अखेर मुहूर्त लागला आहे. पहिल्या टप्प्यात अनुकंपा तत्त्वावरील ५५ पदे भरली जातील. त्यानंतर ९०० पेक्षा जास्त जागा भरण्यात येणार आहेत. मनपाच्या उत्पन्नाच्या ३५ टक्क्यांपेक्षा अधिक खर्च वेतनावर व्हायला नको, असा नियम असल्यामुळे टप्प्याटप्प्याने भरती करण्यात येणार आहे.

राज्य सरकारने महापालिकांना नोकरभरतीचे आदेश दिले आहेत. याअंतर्गत प्राधान्यक्रमाने १२३ पदे भरण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आधीच सादर केलेला आहे. मात्र अद्याप त्यास मंजुरी दिलेली नाही. ताेपर्यंत महिनाअखेरपर्यंत ५५ पदे भरली जातील, असे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले. त्यादृष्टीने ५५ उमेदवारांची यादी तयार करून कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. महापालिकेच्या नवीन आकृतिबंधानुसार सुमारे ९०० पदांची निर्मिती होणार आहे. ही पदे भरताना मनपाला आस्थापना खर्चाचा नियम पाळावा लागेल. सध्या आस्थापनावरील खर्च ४०.४२ टक्के आहे. सर्वच पदे भरली तर हा खर्च कमालीचा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनपाने अत्यावश्यक पदांची यादी तयार करून १२३ पदांच्या भरतीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला.

बातम्या आणखी आहेत...